Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: नाना पटोले नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे सांगणारे...

फॅक्ट चेक: नाना पटोले नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे सांगणारे न्यूजकार्ड खोटे आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाराज झाले असून काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.
Fact

व्हायरल न्यूजकार्ड बनावट आहे. संबंधित चॅनेलनेही अशापद्धतीची बातमी आपण चालविली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या दाव्यात आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनासुद्धा लक्ष करण्यात आले आहे. नाना पटोले नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

फॅक्ट चेक: नाना पटोले नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे सांगणारे न्यूजकार्ड खोटे आहे
Courtesy: X@garg_trupti

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.

“पूर्ण वाट लावल्याशिवाय सोडू नका कांग्रेस नाना” अशा कॅप्शनखाली हा दावा करण्यात आला आहे. ‘News 18 लोकमत’ चॅनेलचा लोगो आणि वरील भागात ‘महाराष्ट्राचा महासंग्राम’ असे लिहून संबंधित टीव्ही चॅनेलच्या ब्रेकिंग न्यूजचा आभास या न्यूजकार्डच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

Fact Check/ Verification

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या या दाव्याच्या चौकशीसाठी आम्ही संबंधित कीवर्डस Google वर शोधले. मात्र कोणत्याच अधिकृत माध्यमाने अशी बातमी दिल्याचे आम्हाला दिसले नाही. विशेष म्हणजे ज्या ‘News 18 लोकमत’ चॅनेलचा लोगो वापरण्यात आला आहे, त्या चॅनेलनेही अशाप्रकारची बातमी दिल्याचे आमच्या पाहणीत आले नाही.

फॅक्ट चेक: नाना पटोले नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे सांगणारे न्यूजकार्ड खोटे आहे
Google Search

आम्ही ‘News 18 लोकमत’ च्या अधिकृत युट्युब चॅनेलवरील व्हिडीओ धुंडाळले. मात्र तेथेही आम्हाला अशी माहिती किंवा बातमी असलेला व्हिडीओ पाहायला मिळाला नाही.

फॅक्ट चेक: नाना पटोले नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे सांगणारे न्यूजकार्ड खोटे आहे
News 18 Lokmat Video List

पुढील तपासात आम्हाला ‘News 18 लोकमत’ ने आपल्या X खात्यावरून दाव्याचे खंडन करणारे ट्विट 22 ऑक्टोबर 2024 रोजी केल्याचे आमच्या निदर्शनास आले.

फॅक्ट चेक: नाना पटोले नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे सांगणारे न्यूजकार्ड खोटे आहे
Courtesy: X@News18Lokmat

“न्यूज18 लोकमतच्या नावाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या संदर्भात अशी फेक पोस्ट व्हायरल होत आहे. संबंधित वृत्त हे खोटे आहे. याचा न्यूज18 लोकमतशी काहीही संबंध नाही. न्यूज18 लोकमतने असे कोणतेही वृत्त दिले नाही.” असे या पोस्टमध्ये म्हटलेले आहे.

तरीही खात्रीसाठी आम्ही काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याशी संपर्क साधला. “निवडणुकीच्या काळात असे खोटे दावे करून खोटी माहिती पसरविण्याचा प्रकार सुरु आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा प्रश्नच येत नाही.” अशी माहिती आम्हाला मिळाली.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाराज झाले असून काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, असे सांगणारा दावा खोटा आहे. हे स्पष्ट झाले आहे. व्हायरल न्यूजकार्ड बनावट आहे. संबंधित चॅनेलनेही अशापद्धतीची बातमी आपण चालविली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Result: False

Our Sources
Google Search
Analysis of News 18 Lokmat Youtube channel
Tweet made by News 18 Lokmat on October 22, 2024
Conversation with Congress Leader Nana Patole

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular