Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
पारंपारिक युद्धकलेचा सराव करणारी महिला दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये पारंपारिक युद्धकलेचा सराव करणारी महिला दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता नसून मराठी अभिनेत्री पायल जाधव आहे.
पारंपारिक युद्धकलेचा सराव करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. सदर महिला दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता असल्याचा दावा केला जात आहे. आमच्या तपासात ती महिला मराठी अभिनेत्री असल्याचे स्पष्ट झाले.
२० फेब्रुवारी २०२५ रोजी, भाजप आमदार रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या.
दरम्यान, रेखा गुप्ता यांच्या नावाने एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. २० फेब्रुवारी २०२५ रोजी शेअर केलेल्या १:५२ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, साडी परिधान केलेली एक महिला पारंपारिक युध्दकलेचा सराव करताना दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये (संग्रहित) असे लिहिले आहे, “आता दिल्लीच्या मुख्यमंत्री असलेल्या आरएसएस कार्यकर्त्या सुश्री रेखा गुप्ता यांचा जुना व्हिडिओ.” अशा इतर पोस्टचे संग्रहण येथे आणि येथे पहा.

आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर आढळला.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यासाठी, आम्ही गुगल लेन्स वापरून त्याच्या मुख्य फ्रेम्स शोधल्या. या दरम्यान, आम्हाला आढळले की हा व्हिडिओ पायल जाधव नावाच्या महिलेच्या इंस्टाग्रामवर (संग्रहण) १९ फेब्रुवारी २०२५ रोजी पोस्ट करण्यात आला होता.

पायल जाधवच्या इंस्टाग्रामवर शोध घेतल्यानंतर आम्हाला आढळले की ती एक मराठी अभिनेत्री आहे आणि तिच्या अकाउंटवरून असे अनेक व्हीडिओ यापूर्वी पोस्ट केले गेले आहेत. चौकशीदरम्यान, आम्हाला असेही आढळून आले की तिने ५ जानेवारी २०२३ रोजी व्हायरल क्लिपमध्ये घातलेल्या पोशाखात आणखी एक पोस्ट शेअर केली होती.

१९ फेब्रुवारी २०२५ रोजी पोस्ट केलेल्या या व्हिडिओच्या मराठी कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोर कर्तुत्वाला नमन. शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत, प्रौढप्रतापपुरंदर अशा थोरल्या महाराजांकडून प्रेरणा घेत केलेला हा माझा छोटा प्रयत्न.” कॅप्शनमध्ये या प्रशिक्षणाचे श्रेय सव्यसाची गुरुकुलमला दिले आहे.

चौकशीत पुढे, आम्ही कोल्हापूर येथील सर्वोदय मर्दानी क्रीडा प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधला, जिथे आम्ही लखन जाधव यांच्याशी बोललो. दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात त्यांनी स्पष्ट केले की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी महिला मराठी अभिनेत्री पायल जाधव आहे. लखन जाधव यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः पायल जाधवला पारंपरिक युद्धकलेचे प्रशिक्षण दिले आहे.
न्यूजचेकरने अभिनेत्री पायल जाधवशीही संपर्क साधला, त्यांनी स्पष्ट केले की व्हायरल व्हिडिओमध्ये त्या स्वतः आहेत, दिल्लीच्या मुख्यमंत्री नाही. हा व्हिडिओ शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पोस्ट केला होता. जेव्हा तो व्हायरल झाला तेव्हा गैरसमज झाला. तथापि, व्हिडिओमध्ये दुसरी कोणी नसून मीच आहे, असे त्या म्हणाल्या.
तपासातून असा निष्कर्ष निघाला की, व्हायरल व्हिडिओमध्ये सराव करणारी महिला दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता नसून मराठी अभिनेत्री पायल जाधव आहे.
Sources
Instagram Post by Marathi actress Payal Jadhav
Phonic conversation with her trainer Lakhan Jadhav
Conversation with Marathi actress Payal Jadhav
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025
Kushel Madhusoodan
November 26, 2025