Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckNewsमहाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयपीएस अधिकारी नाही ही मुलगी, वाचा व्हायरल दाव्याचे...

महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयपीएस अधिकारी नाही ही मुलगी, वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim
ही मुलगी महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयपीएस अधिकारी बनली आहे.
दाव्याचे संक्षिप्त विवरण-
 Asamakhan pathan या ट्विटर हॅंडलवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यात एक हिजाब घातलेली मुलगी खुर्चीवर बसली असून तिच्याभोवती काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उभे राहिले आहेत. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ही मुलगी महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयपीएस अधिकारी आहे. महिला दिनानिमित्त तिला शुभेच्छा ही देण्यात आल्या आहेत.
Verification- 
आम्ही व्हायरल फोटोची पडताळणी सुरु केली. गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या मदतीने शोध सुरु केला पण महाराष्ट्रातील पहिली महिला आयपीएस अधिकारी झालेल्या मुलीबद्दलची बातमी आढळून आली नाही. याच शोधादरम्यान आम्हाला फेसबुक वर याच दाव्याचा अनेक पोस्ट दिसून आल्या. एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की महाराष्ट्रात 24 वर्षांची एक मुस्लिम मुलगी आयएएस अधिकारी झाली आहे.
याशिवाय याच दाव्याच्या अनेक पोस्ट आढळून आल्या.
शोध सुरुच ठेवला असता आम्हाला एक फेसबुक पोस्ट आढळून आली यात म्हटले आहे की. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील महिला दिनाच्या निमित्ताने एका 14 वर्षाच्या विद्यार्थिनीला एक दिवसासाठी पोलिस अधीक्षक करण्यात आले.
आम्ही याबाबतीत काही कीवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला देशदूत या वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. यात म्हटले आहे कि जागतिक महिला दिनाच्या   औचित्यावर बुलढाण्यात एका विद्यार्थिनीला एक दिवसाची पोलीस अधीक्षक करण्यात आले.
महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेतून जागितक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आहे. याचाच एक भाग म्हणून मलकापूर जिल्हा परिषद उर्दू हायस्क्लूमधील नववीमध्ये शिकणारी सहरीश कंवल नावाच्या विद्यार्थिनीला एक दिवसासाठी पोलिस अधीक्षक कऱण्यात आहे. तिचे वडील गॅॅरेज मॅकेनिक आहेत तर आई गृहिणी आहे.
याशिवाय आम्हाला टाईम्स आॅफ इंडियाच्या युट्यूब चॅनल वर देखील व्हिडिओ आढळून आला.
या पडताळणीदरम्यान आम्ही अनेक टुल्स आणि किवर्ड्सचा वापर करत बारकाईने शोध घेतला. यावरुन हेच लक्षात आले की हा महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयपीएस अधिकारी म्हणून ज्या मुलीचा फोटो व्हायरल झाला आहे ती नववीची विद्यार्थिनी असून तिला महिला दिनानिमित्त बुलढाणा  एक दिवसासाठी ुपोलिस अधीक्षक करण्यात आले होते. तिचे हेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल झाले. 
Sources 
Twitter Advanced Search
Facebook Search
Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular