Wednesday, April 23, 2025
मराठी

Fact Check

आपचे खासदार संजय सिंह यांनी नितीन गडकरींचा एडिटेड व्हिडिओ शेअर केलाय, या व्हिडिओचे सत्य जाणून घ्या

banner_image

याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख अर्जुन देवडिया याने लिहिला आहे.

सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गडकरी भाजप सोडणार असल्याची चर्चा वर्तवली जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गडकरी बोलले की, मी पारंगत राजकारणी नाहीये. मंत्रिपद गमावले तरी हरकत नाही, असे म्हणाताना ऐकू येत आहे. त्यानंतर त्यांनी आपण सामान्य व्यक्ती असून सामान्य जीवन जगण्यास प्राधान्य देत असल्याचे म्हटले आहे. 

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.

फोटो साभार : Twitter@AnumaVidisha

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.

हा व्हिडिओ ट्विट करत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी लिहिले आहे की,”नितीन गडकरीजी असे का म्हणाले? भाजपाचा मोठा गोंधळ सुरू आहे.” या व्यतिरिक्त हा व्हिडिओ काही अधिकृत खात्यावरून देखील शेअर करणयात आला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपाने आपल्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांचे नाव काढून टाकले होते. याकडे मोठा बदल म्हणून पाहिले जात आहे. या निर्णयानंतर भाजप हायकमांड गडकरी यांच्यावर आनंदी नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यात आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात भाजपा गडकरींना बाहेरचा रस्ता दाखवू शकते, असा दावा केला जात आहे.

Fact Check / Verification

व्हायरल व्हिडिओची पडताळणी करत असतांना आम्हांला नितीन गडकरी यांचे एक ट्विट मिळाले. ज्यात लिहिले होते की, काही लोक सोशल मीडियावर त्यांचे विधान चुकीच्या संदर्भात मांडत आहे. पुढे असे चालू राहिल्यास चुकीचे काम करणाऱ्यांना कायद्याच्या उत्तर द्यायला मागेपुढे पाहणार नाही, असे गडकरी यांनी लिहिले आहे. या सोबत गडकरींनी एक यु ट्यूबची लिंक देखील ट्विट केली आहे. ज्यातून व्हायरल झालेल्या व्हिडिओचा काही भाग हटवण्यात आला आहे. 

नितीन गडकरी यांनी हा व्हिडिओ २४ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांच्या यु ट्यूब वाहिनीवर अपलोड केला होता. ‘नौकरशाही के रंग’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तिथे त्यांनी भाषण केले. यु ट्यूबवरील तो व्हिडिओ याच भाषणाचा आहे. या भाषणादरम्यान महाराष्ट्राचे मनोहर जोशी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, तेव्हाचा गडकरींनी १९९६-९७ मधील एक किस्सा सांगितला. 

या किस्साचा सारांश गडकरींनी स्पष्ट करत सांगितले की,”मी महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना अमरावतीच्या मेळघाट तालुक्यात अडीच हजार बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. या घटनेने जगभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी नाराज झाले होते. मेळघाटातील साडेचारशे गावांत रस्ते नाहीत ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे, असे जोशींनी गडकरींना सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना गडकरी या समस्येबाबत वन अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असत. 

“या समस्यांबाबत वनविभागाचे काही वरिष्ठ अधिकारी मनोहर जोशी आणि गडकरी उपस्थित होते. जोशी वनविभागाच्या लोकांना प्रश्न विचारत होते की, वन पर्यावरण कायद्याच्या आधारे तुम्ही रस्तेबांधणी तसेच अन्य कामांवर बंदी घातली आहे. त्यामुळे गावांत सुविधा पोहोचत नाही. त्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, आम्ही मजबूर आहे. आम्ही काहीही करू शकत नाही. 

तेव्हा सभेला उपस्थित असलेले गडकरी मुख्यमंत्र्यांना म्हणाले की,”हे काम त्यांच्यावर सोडा. ही विकासकामे ते करणार आहे. त्याचवेळी गडकरी मुख्यमंत्री जोशींना म्हणाले की,शक्य असेल तर तुम्ही माझ्यासोबत उभे राहा आणि शक्य नसेल तर मला परिणामांची कोणतीही काळजी नाही. माझे पद गेले तरी मला त्याची पर्वा नाही.”

गडकरींच्या म्हणण्यानुसार, या बैठकीनंतर त्यांनी स्वतः गावांना भेटी दिल्या, तेव्हा त्यांना तिथे रस्ते नसल्याचे समजले. त्यानंतर गडकरींनी या समस्येचा एक अहवाल तयार करून मंत्रालयात पाठवला होता. ते अहवाल वेगवेगळ्या ठिकाणाहून गडकरींकडे आले. 

“या अहवालाला गडकरींनी उत्तर दिले की, मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून लोकांना गावाकडे जाण्यासाठी रस्ता नाही, हे दुर्दैवी आहे. हे लोकांचे शोषण आहे. यासाठी वनविभागाने कायद्याच्या आधारे परवानगी न देणे चुकीचे आहे. त्यामुळे मी मंत्री असल्याच्या नात्याने निर्णय देतो की, या साडेचारशे गावांत रस्ते बांधले पाहिजेत. कायद्यात काही अडचण आल्यास त्याची जबाबदारी मंत्री म्हणून माझी असेल.”

या गोष्टी लिहिल्यावर त्यावेळी गडकरींचे सचिवांनी देखील असेच सांगितले की,”सर तुम्ही हे कसे लिहिले.” यावर गडकरींनी उत्तर दिले की,”त्यांना पर्वा नाही. ते पारंगत राजकारणी नाहीत. जे होईल ते पाहता येईल.” त्यानंतर साडेचारशे गावांत गडकरींनी रस्ते बांधले. 

नितीन गडकरींनी या यु ट्यूब व्हिडिओमध्ये सांगितलेला हा किस्सा ७:२५ ते १२:०० मिनिटांच्या दरम्यान ऐकता येईल. हा संपूर्ण व्हिडिओ ऐकून स्पष्ट होते की, मंत्रिपद जाण्याची गोष्ट नोकरशाहीचा एक जुना अनुभव सांगतानाची आहे. जेव्हा ९० च्या दशकात ते महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. केंद्रीय मंत्रिपदावर असतांना त्यांनी हे म्हटलेले नाही. 

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ चुकीच्या संदर्भासहित तोडून मोडून शेअर केला जात आहे. 

Result : Missing Context

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,862

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.