Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
जेएनयूचा विद्यार्थी शर्जिल इमामच्या सुटकेसाठी शेतकरी आंदोलदरम्यान मोर्चा काढण्यात आल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. भाजप युवा मोर्चाशी संबंधित वैशाली पोद्दार यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला असून ट्विटमध्ये म्हटले आहे की, शेतकरी आंदोलनाने ‘एमएसपी’ ते ‘एफएसआय’ (फ्री शर्जिल इमाम) असा मोठाच प्रवास पूर्ण केला आहे.
जेएनयूचा विद्यार्थी शर्जिल इमाम यास जानेवारी २०२० मध्ये कथितरित्या देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी बिहारच्या जहानाबाद येथून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर धर्माच्या आधारे गुन्हेगारी कट, देशद्रोह आणि धर्मांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान यांसारखे आरोप ठेवण्यात आलेले आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान खरंच इमामच्या सुटकेसाठी मोर्चा काढण्यात आला होता का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र या आंदोलनादरम्यान शर्जिल इमामच्या सुटकेसाठी मोर्चा काढण्यात आल्याची बातमी आढळून आली नाही.
यानंतर व्हायरल फोटो व्यवस्थित निरखून पाहिला असता फोटोमध्ये जे ‘फ्री शर्जिल इमाम’ बॅनर दिसते आहे, त्याच्या डाव्या कोपऱ्यात ‘वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया’ असे लिहिलेले आढळून आले. यावरुन हे स्पष्ट होते की हा फोटो सध्याच्या शेतकरी आंदोलनादरम्यानचा नाही कारण यात सध्या वरील पार्टीेने भाग घेतल्याचे निदर्शनास आले नाही. अधिक शोध घेतला असता आम्हाला एप्रिल 2020 मधील एका ट्विटमध्ये व्हायरल फोटो आढळून आला.
आम्ही अधिक माहिती मिळविण्यासाठी पुढे शोध सुरु ठेवला असता इंडिया टुडेचा एक लेख आढळून आला ज्यात त्यांनी वेलफेयर पार्टी ऑफ इंडियाच्या केरळ युनिटशी संपर्क साधला. पक्षाचे प्रदेश सचिव साजिद खालिद यांनी याची पुष्टी केली की फोटो यंदाच्या फेब्रुवारीमध्ये तिरुअनंतपुरम येथे पक्षाने काढलेल्या सीएएविरोधी मोर्चाची आहे. “ही प्रतिमा आमच्या पक्षाने फेब्रुवारी २०२० मध्ये नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियम (सीएए) च्या विरोधात आयोजित केलेल्या ‘अधिभोगी राजभवना’च्या निषेधाची आहे. आमदार के. मुरलीधरन यांच्या नावाने प्रतिमेमध्ये दिसणारा वेटिंग शेड तिरुअनंतपुरम राजभवनच्या बाजुला दिसत आहे” असेही खालिद यांनी सांगितल्याचे लेखात म्हटले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की, दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान शर्जिल इमामच्या सुटकेसाठी मोर्चा काढण्यात आलेला नाही. जुन्या आंदोलनाचा फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला आहे.
ट्विटर- https://twitter.com/ImraanSpeaks/status/1250295945817776137
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Saurabh Pandey
August 17, 2023
Yash Kshirsagar
January 28, 2021
Yash Kshirsagar
March 26, 2021