पोलिसांनी दक्षिण मुंबईत दहशतवादी पकडले असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत पोलिसांच्या काही गाड्या एकापाठोपाठ येऊन रस्त्यावरील एका बिल्डिंगसमोर उभ्या राहतात आणि त्यांतून पोलिस उतरतात आणि बिल्डिंगमध्ये घुसतात असे दिसते. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात पोलिसांनी दहशवाद्यांना पकडतानाचा हा व्हिडिओ आहे.

Fact Check / Verification
दक्षिण मुंबईत खरंच दहशतवादी पकडले आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी गूगलमध्ये काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला मात्र कुठेही आम्हाला ही बातमी आढळून आली नाही. दहशवादी पकडले जाणे ही खूप मोठी बातमी माध्यमांत नसणे म्हणजे हा व्हिडिओ पोलिसांच्या दुस-याच कुठल्यातरी कारवाईचा असण्याची शंका निर्माण झाली. यासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओमधून काही किफ्रेम्स काढल्या आणि गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेण्यास सुरवात केली.
यारदरम्यान आम्हाला एका युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ याच दाव्याने 17 फेब्रुवारी रोजी अपलोड केल्याचे आढळून आले. यात देखील पायधुनी परिसरात दहशतवाद्यांनी पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्ही मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅंडलला भेट दिली मात्र इथे देखील दहशवाद्यांना पकड्याची किंवा इतर कुठल्या कारवाईचा हा व्हिडिओ असल्याची माहिती देण्यात आलेली नाही.

अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्ही पायधुनी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष दुधगांवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा व्हिडिओ पायधुनी परिसरातीलच असल्याची माहिती दिली मात्र त्यांनी सांगितले की हा व्हिडिओ पोलिसांच्या कारवाईचा किंवा दहशतवादी पकडल्याचा नसून एका वेबसीरिजच्या शूटिंगचा आहे. दुधगांवकर यांनी मात्र या वेबसीरिजचे नाव सांगितले नाही मात्र त्यांनी शूटिंगसाठी रितसर परवानगी घेतल्याचे नमूद केले.
Conclusion
यावरुन हे स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडल्याचा नसून वेबसीरिजच्या शूटिंगचा आहे.
Result- False
Our Sources
Direct contact
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.