Fact Check
Weekly Wrap: ज्योती मल्होत्रा, मुंबईत आतंकवादी ठार ते ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास पर्यंतच्या दाव्यांचे फॅक्ट चेक
मे महिन्याचा चौथा आठवडाही अनेक फेक दाव्यांमुळे गाजला. मुंबईत पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे आणि दुसरा दहशतवादी मारला गेला आहे, असा दावा करण्यात आला. बीएलएने पाकिस्तान आणि चीनला बलुचिस्तानमधून माघार घेण्याची धमकी दिली आणि हल्ला केला, असा दावा करण्यात आला. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या ज्योती मल्होत्राचा भाजपची टोपी घातलेला फोटो, असा दावा करण्यात आला. ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्रासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, असा दावा करण्यात आला. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे, बस, मेट्रो सेवा आणि अगदी देशांतर्गत विमान प्रवासात मोफत प्रवास सेवा देण्याची घोषणा केली आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमधे वाचता येतील.

हा व्हिडिओ दहशतवाद्याच्या अटकेचा नाही
मुंबईत पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे आणि दुसरा दहशतवादी मारला गेला आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

बीएलएने सध्या दिली पाकिस्तान आणि चीनला धमकी?
बीएलएने पाकिस्तान आणि चीनला बलुचिस्तानमधून माघार घेण्याची धमकी दिली आणि हल्ला केला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

ज्योती मल्होत्राचा भाजपची टोपी घातलेला व्हायरल फोटो खरा नाही
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या ज्योती मल्होत्राचा भाजपची टोपी घातलेला फोटो, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.

हे राहुल गांधींचे ‘गुप्तहेर’ ज्योती मल्होत्रासोबतचे फोटो एडिटेड आहेत
ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्रासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले.

केंद्र सरकारने केली ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सेवा देण्याची घोषणा
केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे, बस, मेट्रो सेवा आणि अगदी देशांतर्गत विमान प्रवासात मोफत प्रवास सेवा देण्याची घोषणा केली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.