Tuesday, December 24, 2024
Tuesday, December 24, 2024

HomeFact CheckViralआमिर खान म्हणाला की, 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट फ्लॉप झाला? चुकीचा दावा...

आमिर खान म्हणाला की, ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट फ्लॉप झाला? चुकीचा दावा व्हायरल

(याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख शुभम सिंह याने लिहिला आहे)

Claim

चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर आमिर खानचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल झाला. त्या व्हिडिओत आमिर खान म्हणतोय की, बऱ्याच लोकांना माझा चित्रपट आवडला नाही आणि हा फ्लॉप होण्याची जबाबदारी मी घेतो. असा दावा केला जातोय की, आमिरने चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ या संदर्भात हे विधान केले आहे. 

फोटो साभार : Twitter@anandkalra69

Fact 

या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही तो व्हिडिओ पुन्हा पाहिला. त्या व्हिडिओत उजव्या कोपऱ्याला वरती ‘हिंदी Rush’ असं लिहिलं होतं. त्यानंतर आम्ही ‘हिंदी Rush’ ही यु ट्यूब वाहिनी शोधण्यास सुरवात केली. तेव्हा आम्हांला त्या वाहिनीवरती २७ नोव्हेंबर २०१८ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला. ‘आमिर खानने ठग्ज ऑफ हिंदुस्थान फ्लॉप झाल्यावर मागितली माफी’ असं त्या व्हिडिओचे शीर्षक होते. त्या व्हिडिओतील ३० व्या सेकंदाचा व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहू शकतो. 

या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अमर उजालाने २७ नोव्हेंबर २०१८ रोजी एक बातमीचा व्हिडिओ अपलोड केला होता. त्या बातमीनुसार, बॉलिवूड अभिनेता आमिर खानने ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्याची जबाबदारी स्वतः घेऊन दर्शकांची माफी मागितली. 

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, आमिर खानचा चार वर्षांपूर्वीच्या विधानाचा व्हिडिओ आताच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाशी जोडत चुकीचा दावा केला जात आहे. 

Result : False

जर तुम्हांला माझी तथ्य पडताळणी आवडत असेल तर असेच विविध लेख या दुव्यावर टिचकी मारून तुम्ही वाचू शकता.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular