Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
दर्जेदार रस्ते आणि फडणवीस यांचा शब्द, परिवर्तन होणारच.
Fact
हा जुना व्हिडिओ चीनमधील एका तुटलेल्या रस्त्याचा आहे.
देशाच्या अनेक भागात सततच्या पावसामुळे पाणी तुंबणे, पूर येणे अशी परिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रातही सध्या पाऊस पडत आहे. दरम्यान, खड्डेमय रस्त्याने भरलेल्या पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचे सांगत शेअर केले जात आहे.
“दर्जेदार रस्ते आणि फडणवीस यांचा शब्द, परिवर्तन तर होणारच..” असा दावा केला जातोय.






दाव्याचे संग्रहण इथे पाहता येईल.
दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. यावेळी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या विविध फलकांवर लिहिलेली भाषा ही भारतीय भाषा असल्याचे दिसत नाही. यानंतर, गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने तपासल्यानंतर आम्हाला आढळले की व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या फलकांवर चिनी भाषा लिहिलेली आहे.



पुढील तपासात, रिव्हर्स इमेजद्वारे व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्स शोधून, आम्हाला हा व्हिडिओ चीनमधील लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म बिलिबिलीवर सापडला. 15 जुलै 2020 रोजी हा व्हिडिओ शेअर करताना, ‘ब्रदर Xiaoqiang123’ या बिलीबिली युजरने कॅप्शनमध्ये सावधपणे वाहन चालवण्याचा सल्ला दिला होता.


व्हिडिओवर चिनी भाषेत लिहिलेल्या माहितीचे भाषांतर केल्यानंतर आम्हाला आढळले की ‘ब्रदर Xiaoqiang123’ युजरने हा व्हिडिओ चीनच्या ग्वांगझू शहराचा असल्याचे वर्णन केले आहे.

तपासादरम्यान, आम्हाला आढळले की ‘ब्रदर Xiaoqiang123’ नावाच्या युजरने त्याच्या बिलीबिली अकाउंटवर चीनमधील विविध जीर्ण रस्त्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. व्हिडिओ शेअर करताना, ‘ब्रदर Xiaoqiang 123’ लोकांना सावधपणे गाडी चालवण्याचा सल्ला देत आहे.


महाराष्ट्रातील खराब रस्ता म्हणून शेअर करण्यात आलेला व्हिडिओ जुना आणि चीनचा असल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही पोचलो. 2021 मध्येही हा व्हिडिओ केरळचा असल्याचे सांगत तर याचवर्षी ऑगस्ट मध्ये गुजरातचा असल्याचे सांगत व्हायरल झाला होता. मल्याळम आणि हिंदी भाषेची तथ्य तपासणी येथे व येथे वाचता येईल.
Sources
Google Translate
Bilibili is a video sharing platform based in China.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Salman
November 29, 2025
Vasudha Beri
October 24, 2025
Sabloo Thomas
October 24, 2025