Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
पहलगाम मध्ये भारतीयांचे रक्षण करणाऱ्या आदिलचा हा मृतदेह आहे.
हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.
पहलगाममध्ये भारतीयांचे रक्षण करणाऱ्या आदिलचा मृतदेह असे सांगत एक छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. असे दावे आम्हाला फेसबुक आणि X वर आढळले.




“सैय्यद आदिल हुसेन भारत मातेचा सुपुत्र भारताच्या नागरिकांचा बचाव करताना शहीद झालेला देह सगळेच अतिरेकी मुसलमान होते सत्त्य आहे पण काही देशप्रेमी हिंदुस्थानी मुस्लिम लढा देत हेते….” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे.
आम्ही प्रथम गुगल लेन्सवर ती प्रतिमा शोधली. दरम्यान, आम्हाला १९ एप्रिल २०२५ रोजी मुस्लिम कॉर्नरने फेसबुक पेजवर शेअर केलेला हाच फोटो मिळाला. परंतु पोस्टमध्ये फोटोची सत्यता स्पष्ट करणारी कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

अधिक तपास करताना, आम्हाला या महिन्यात १३ एप्रिल रोजी झैनब या X हँडलवर तोच फोटो मिळाला. ज्यासोबत ‘गाझा’ हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे.

याशिवाय, ८ एप्रिल २०२५ रोजी अल अरब नावाच्या फेसबुक पेजनेही हा फोटो शेअर केला होता. यावरून हे स्पष्ट झाले की पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वीच हा फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता आणि या हल्ल्यापूर्वीच हा फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहे.

परंतु आम्ही स्वतंत्रपणे फोटो कुठला आहे आणि तो कोणाचा आहे याची पडताळणी करू शकलो नाही. मात्र हे स्पष्ट आहे की हे चित्र पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित नाही.
ऑनलाइन सापडलेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध झाले की व्हायरल फोटो पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मारला गेलेला सय्यद आदिल हुसेन शाहचा नाही.
Sources
Facebook post by Muslimscornerofficial on 19 April 2025
X post by @ZeynepNur2534 on 13 April 2025
Facebook post by ahmed.m.abdallah.saqr on 08 April 2025
(हे आर्टिकल न्यूजचेकर उर्दूसाठी मोहम्मद झकारिया यांनी केले असून येथे वाचता येईल.)
Runjay Kumar
December 13, 2025
Vasudha Beri
December 12, 2025
Vasudha Beri
December 10, 2025