Authors
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर विविध फेक दावे करण्यात आले. एका एलियनने प्रज्ञान रोव्हर तोडून धमकीचा संदेश पाठवला आहे, असा दावा करण्यात आला. इंदिरा गांधींनी मुस्लिम पैलवानाने हिंदू पैलवानास मारताना दाखवणारा स्टॅम्प जारी केला होता, असा दावा करण्यात आला. हैदराबादमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघासमोर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात आला. राजस्थान सरकारने इक्बालच्या कुटुंबाला 50 लाख रुपये दिले, तर कन्हैयालालच्या कुटुंबाला केवळ 5 लाख रुपये दिले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक आपण या रिपोर्टमध्ये वाचू शकता.
एका एलियनने प्रज्ञान रोव्हर तोडून धमकीचा संदेश पाठवला?
एका एलियनने प्रज्ञान रोव्हर तोडून धमकीचा संदेश पाठवला आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
इंदिरा गांधींनी मुस्लिम पैलवानाने हिंदू पैलवानास मारताना दाखवणारा स्टॅम्प जारी केला होता?
इंदिरा गांधींनी मुस्लिम पैलवानाने हिंदू पैलवानास मारताना दाखवणारा स्टॅम्प जारी केला होता, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
पाक क्रिकेट संघासमोर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या?
हैदराबादमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघासमोर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
कन्हैयालालच्या कुटुंबाला केवळ 5 लाख रुपये मिळाले?
राजस्थान सरकारने इक्बालच्या कुटुंबाला 50 लाख रुपये दिले, तर कन्हैयालालच्या कुटुंबाला केवळ 5 लाख रुपये दिले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा