Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact Checkसंयुक्त राष्ट्रसंघ (UN) ने इस्रायलच्या हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनींच्या मृत्यूची ही आकडेवारी जाहीर केली...

संयुक्त राष्ट्रसंघ (UN) ने इस्रायलच्या हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनींच्या मृत्यूची ही आकडेवारी जाहीर केली आहे का?

Authors

A self-taught social media maverick, Saurabh realised the power of social media early on and began following and analysing false narratives and ‘fake news’ even before he entered the field of fact-checking professionally. He is fascinated with the visual medium, technology and politics, and at Newschecker, where he leads social media strategy, he is a jack of all trades. With a burning desire to uncover the truth behind events that capture people's minds and make sense of the facts in the noisy world of social media, he fact checks misinformation in Hindi and English at Newschecker.

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
इस्रायली हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनींच्या मृत्यूबाबत संयुक्त राष्ट्रांनी (UN) डेटा प्रकाशित केला आहे.
Fact
व्हायरल दाव्यात OCHA oPt (UN Office for the Coordination of Humanitarian Affairs in the Palestinian territory) ने जारी केलेल्या आकडेवारीला वाढवून सांगण्यात आले आहे.

सोशल मीडिया आणि मेसेजिंग अप्सवर टेक्स्ट मेसेज शेअर करून, इस्त्रायली हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनींच्या मृत्यूंबाबत संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) प्रकाशित केलेला डेटा असे वर्णन केले जात आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ (UN) ने इस्रायलच्या हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनींच्या मृत्यूची ही आकडेवारी जाहीर केली आहे का?
Newschecker च्या टिपलाइनवर आलेला दावा

देशांमधील युद्ध किंवा संघर्षाचा सर्वात भयावह पैलू म्हणजे त्यात सहभागी देशांतील निष्पाप नागरिकांचा मृत्यू. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षातही हजारो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता राखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र (UN) सारख्या संस्था मानवाधिकार, मानवता आणि सहभागी देशांमधील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करतात, ज्यामध्ये सहभागी देशांमधील नागरिकांच्या मृत्यूची आकडेवारी गोळा करणे आणि प्रकाशित करणे समाविष्ट आहे. या क्रमाने, सोशल मीडिया आणि मेसेजिंग अप युजर्स एक टेक्स्ट मेसेज शेयर करत आहेत आणि त्याला इस्रायली हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनींच्या मृत्यूसंदर्भात संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) प्रकाशित केलेला डेटा असे सांगत आहेत.

व्हायरल दाव्यासंदर्भात शेअर केलेले ट्विट येथे पाहिले जाऊ शकतात.

Fact Check/ Verification

इस्रायली हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनी लोकांच्या मृत्यूसंदर्भात संयुक्त राष्ट्रांनी (UN) प्रकाशित केलेल्या आकडेवारीच्या नावाने शेअर केल्या जाणाऱ्या या दाव्याची चौकशी करण्यासाठी, आम्ही Google वर ‘israel palestine conflict total casualties’ हा कीवर्ड शोधला. या प्रक्रियेत आम्हाला OCHA oPt (UN Office for the Coordination of Humanitarian Affairs in the occupied Palestinian territory) द्वारे इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षासंदर्भात प्रकाशित डेटा प्राप्त झाला.

संयुक्त राष्ट्रसंघ (UN) ने इस्रायलच्या हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनींच्या मृत्यूची ही आकडेवारी जाहीर केली आहे का?
गुगल सर्च वरून मिळालेले निकाल

दोन्ही देशांमधील संघर्षांमध्ये पॅलेस्टिनींच्या मृत्यूसंदर्भात संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या वर्षवार आकडेवारीनुसार, 2008 मध्ये 899, 2009 मध्ये 1066, 2010 मध्ये 95, 2011 मध्ये 124, 2012 मध्ये 260, 2013 मध्ये 239, 2014 मध्ये 2329, 2015 मध्ये 174, 2016 मध्ये 109, 2017 मध्ये 77, 2018 मध्ये 330, 2019 मध्ये 138, 2020 मध्ये 30, 2021 मध्ये 349, 2022 मध्ये 191 तसेच 2023 (सध्याचा संघर्ष वगळून) मध्ये 227 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ (UN) ने इस्रायलच्या हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनींच्या मृत्यूची ही आकडेवारी जाहीर केली आहे का?
दोन देशांमधील संघर्षांमध्ये पॅलेस्टिनी लोकांच्या मृत्यूबाबत UN द्वारे प्रकाशित केलेली वर्षवार आकडेवारी

संस्थेने प्रकाशित केलेल्या याच अहवालात, त्यात वापरल्या जाणार्‍या विविध संज्ञांची व्याख्या आणि डेटाचे संकलन आणि प्रकाशन यासंबंधीचे स्पष्टीकरण देखील खाली दिले आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, प्रकाशित झालेली आकडेवारी संस्थेच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी संकलित करून प्रकाशित केली आहे. या डेटामध्ये केवळ दोन देशांमधील संघर्षांची आकडेवारी असल्याचेही संस्थेकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये थेट युद्धाव्यतिरिक्त इतर कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचा समावेश नाही, जसे की सुविधांचा अभाव, शस्त्रांचा निष्काळजी वापर, न वापरलेल्या स्फोटकांचा स्फोट तसेच बोगदे कोसळणे किंवा पडणे.

संयुक्त राष्ट्रसंघ (UN) ने इस्रायलच्या हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनींच्या मृत्यूची ही आकडेवारी जाहीर केली आहे का?

Conclusion

अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की इस्रायलच्या हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनींच्या मृत्यूबाबत संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) प्रकाशित केलेल्या आकडेवारीच्या नावाने शेअर केला जात असलेला हा दावा दिशाभूल करणारा आहे. खरं तर, OCHA oPt (UN Office for the Coordination of Humanitarian Affairs in the occupied Palestinian territory) ने जारी केलेली आकडेवारी अतिशयोक्तीपूर्णरित्या वाढवून शेयर करण्यात आली आहे.

Result: Partly False

Our Sources

Data published by OCHA oPt (UN Office for the Coordination of Humanitarian Affairs in the occupied Palestinian territory)
Newschecker analysis

(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम सौरभ पांडे यांनी केले आहे.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in

फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular