Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
आंध्र प्रदेशचे प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर आणि मुंबईतील सिद्धी विनायक मंदिर ट्रस्ट संदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल आहे. यात म्हटले आहे की, तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर रेड्डी हिंदू नसून ख्रिश्चन धर्माचे आहेत, तर सिद्धी विनायक मंदिर ट्रस्टचे एक विश्वस्त मुस्लिम असून त्यांचे नाव सलीम आहे. आता हिंदूंनाही हाजी अलीचे विश्वस्त केले पाहिजे असा दावा केला जात आहे.
संग्रहित
CrowdTangle वर मिळालेल्या माहितीनुसार या दाव्यासंदर्भात फेसबुकवर 2624 इंट्रेक्शन्स झालेली आहे तर Sanskriti नावाच्या पेजवरून शेअर केलेल्या या पोस्टला सर्वात जास्त 795 लाईक्स मिळालेल्या आहेत. तर शेकडो यूजर्सनी ही पोस्ट शेअर केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्याची सत्यता पडताळणीसाठी आम्ही Google वर काही किवर्डसच्या मदतीने शोध घेतला. या शोधा दरम्यान आम्हाला तिरुपती बालाजी मंदिराची वेबसाइट आढळून आली. या वेबसाईटवर आम्हाला तिरुपपती मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांबद्दल माहिती मिळाली. यानुसार तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी आहेत.
वाय. व्ही सुब्बा रेड्डी यांची 2019 मध्ये मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर, 22 जून 2019 रोजी, त्यांनी या पदावर स्थापित होण्याची शपथ घेतली. आम्ही तिरुपतीच्या संकेतस्थळावर अधिक शोध घेतला पण आम्हाला चंद्रशेखर रेड्डी यांचे नाव ट्रस्टींमध्ये आढळून आले नाही.ट्रस्टींपैकी कोणाचेच नाव चंद्रशेखर रेड्डी असे नाही.
वाय. व्ही सुब्बा रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे जवळचे मानले जातात. जगमोहन ख्रिश्चन आणि हिंदू धर्म मानतात. अशा वेळी जेव्हा वाय व्ही सुब्बा रेड्डी ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले तेव्हा बर्याच लोकांनी त्यांच्या धर्माबद्दल आक्षेप नोंदविला. त्यानंतर वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले होते.आम्हाला The News Minute या वेबसाईटवर 6 जून 2019 प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. यात सुब्बाराव रेड्डी आपण हिंदू असल्याचे स्पष्टिकरण दिल्याचे म्हटले आहे.
यानंतर आम्ही पोस्टमध्ये मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबद्दल केलल्या दाव्याची सत्यता पडताळणी सुरु केली यासाठी आम्ही सिद्धी विनायक मंदिराच्या वेबसाईटला भेट दिली. यात आम्हाला विश्वस्त मंडळाची यादी आढळून आली. या ट्रस्टचे अध्यक्ष भावोजी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले आदेश बांदेकर आहेत आम्ही विश्वस्तांची संपूर्ण यादी तपासली, परंतु सलीम नावाचा कोणताही विश्वस्त आम्हाला आढळून आला नाही. आम्ही मंदिराशी संबंधित इतर सदस्यांची यादी तपासली, पण कोणत्याही यादीमध्ये आम्हाला सलीम नावाची व्यक्ती आढळून आली नाही.
आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की तिरुपती बालाजी मंदिर आणि सिद्धी विनायक मंदिराविषयीचा दावा खोटा आहे. तिरुपती बालाजी मंदिराचे अध्यक्ष ख्रिश्चन नाहीत आणि सिद्धि विनायक मंदिर ट्रस्टच्या कोणत्याही विश्वस्तांचे नाव सलीम नाही. तसेच मंदिरात विश्वस्ता मंडळात इतर कोणतेही सदस्य मुस्लिम धर्माचे नाहीत. दोन्ही मंदिरांबाबत केलेले दावे हे दिशाभूल करणारे आहेत.
Read More : शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या व्हायरल फोटोचे काय आहे सत्य?
TTD – https://www.tirumala.org/TTD%20Trust%20Board.aspx
Siddhi vinayak –https://www.siddhivinayak.org/board-of-trustees/
Thenewsminute –https://www.thenewsminute.com/article/row-over-claim-likely-ttd-chairman-yv-subba-reddy-christian-he-denies-103178
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
February 26, 2025
Prasad S Prabhu
January 31, 2025
Prasad S Prabhu
January 29, 2025