Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact Checkपेट्रोल पंप वर किचेन देऊन होतेय लूट, असा मेसेज आपल्याला आलाय? हा...

पेट्रोल पंप वर किचेन देऊन होतेय लूट, असा मेसेज आपल्याला आलाय? हा भीती घालण्याचा एक प्रकार

महाराष्ट्र आणि विशेषतः बेळगावसह कर्नाटक आणि महाराष्ट्राशी जोडलेल्या सीमाभागात एक मेसेज सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. “सावधान, पेट्रोल पंप किंवा शॉपिंग मॉल मध्ये एकाद्या उत्पादनाच्या प्रमोशन च्या नावाखाली आपल्याला किचेन दिले जात आहेत. ते स्वीकारू नका. कारण त्या किचेन मधील विशिष्ट डिव्हाईस च्या माध्यमातून ट्रॅक होऊन तुम्ही लुटले जाऊ शकता.” असे तो मेसेज सांगतो.

पेट्रोल पंप वर किचेन देऊन होतेय लूट
Screengrab of viral message

“तुमच्या घरा पर्यंत तुमचा पाठलाग करून तुम्हाला लुटण्याचा एक नवा मार्ग आला आहे, तेंव्हा तुमचे कुटुंबीय आणि मित्रांना कळवा आणि हा मेसेज फॉरवर्ड व शेयर करा.” असे आवाहन करण्यात येत आहे. काही युजर्सनी याबद्दलचे सत्य शोध अशी मागणी न्यूजचेकर मराठीकडे केली.

पेट्रोल पंप वर किचेन देऊन होतेय लूट
Screengrab of viral message

Fact Check/ Verification

या मेसेज ची सत्यता तपासण्यासाठी आम्ही काही कीवर्ड च्या माध्यमातून गुगल वर सर्च केला मात्र कोणतीच अधिकृत माहिती सापडू शकली नाही. या मेसेज मध्ये किचेन वाट्ल्याचा आणि प्रामुख्याने पेट्रोल पंपांवर ते वाटले जात असल्याचा उल्लेख आल्याने आम्ही कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमारेषेवरील पेट्रोल पंपांवर असे किचेन वाटले जात आहेत का? हे शोधले. मात्र तसे आढळले नाही.

अधिक पडताळणी करण्यासाठी आम्ही कर्नाटक पेट्रोल पंप ओनर्स असोशिएशनचे संचालक प्रशांत मेलगे यांच्याशी संपर्क साधला, “अशाप्रकारे कोणत्याही उत्पादनाचे प्रमोशन कोणत्याही पेट्रोल पंप वर केले जात नाही. अशी माहिती त्यांनी दिली. पेट्रोलियम कंपन्यांच्या नियमानुसार असे करण्यास बंदी आहे. तसेच हा मेसेज पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि खोटा आहे.” असे त्यांनी सांगितले. “पेट्रोल पंपांवर कोणत्याही प्रकारच्या वस्तूंना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे ग्राहकांना त्या वाटण्याचा प्रश्नच येत नाही.” असेही त्यांनी सांगितले.

आम्ही यासंदर्भात अधिक पडताळणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पेट्रोल पंप असोशिएशनचे संचालक राजीव जलाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी “हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याची माहिती दिली.” “एकंदर प्रकार ग्राहकांच्या मनात भीती निर्माण करणारा असून असा मेसेज पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.”

महाराष्ट्र पोलीस दलाकडे याबद्दल काही माहिती आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस महासंचालक संजय शिंत्रे यांच्याशी आम्ही बातचीत केली. त्यांनी ” अशाप्रकारे पेट्रोल पंप किंवा शॉपिंग मॉल सारख्या ठिकाणी किचेन वाटले जाऊन, त्यानंतर पाठलाग करून लूट करण्याची कोणतीही घटना घडल्याची नोंद अद्याप झालेली नसल्याचे सांगितले. सायबर सेल ने ऑनलाईन पोर्टल वरून तक्रारी स्वीकारण्याची व्यवस्था सुरु केली आहे. त्यावर अशी तक्रार आल्याचे अद्याप ऐकिवात नाही. तसेच अशाप्रकारे व्हायरल होत असलेल्या संदेशाबद्दल आपण लवकरच तपास सुरु करणार आहोत.” असे न्यूजचेकर शी बोलताना सांगितले.

व्हायरल पोस्ट मध्ये वापरण्यात आलेली किचेन्स ही हे की locator आहेत. कोणत्याही प्रकारच्या चाव्या उदा.घर वाहन हरवल्यास GPS द्वारे शोधून देते. अनेक साईट्सवर याची माहिती उपलब्ध असल्याची माहितीही मिळाली असून त्याबद्दल आपण येथे पाहू शकता.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात पेट्रोल पंप किंवा शॉपिंग मॉल वर किचेन वाटले जाऊन लूट केली जात असल्याचा व्हायरल होणार दावा पूर्णपणे चुकीचा आणि समाजात भीती निर्माण करणारा व दिशाभूल करणारा असल्याचे उघड झाले आहे.

Result: False


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Sources

Telephonic conversation with Directors of Karnataka and Maharashtra Petrol pump owners Association

Telephonic conversation with Maharashtra Cyber Cell DGP

Most Popular