Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
उत्तर प्रदेशमध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्र येत असून काँग्रेसला पाठिंबा देत असल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात आला आहे.
UP East Youth Congress ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा फोटो शेअर केला असून लिहिले आहे की, ‘गंगा जमुना तहजीबच चित्र काही विषारी लोकांच्या विषाने संपणार नाही. उत्तर प्रदेशात यावेळी केवळ काँग्रेसचेच वर्चस्व असल्याचेही हे चित्र दर्शवत आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आम्ही एकमेकांचे भाऊ! उत्तर प्रदेशात काँग्रेस येत आहे!’
संग्रहित ट्विट इथे पहा.
हा दावा फेसबुकवर देखील व्हायरल झाला आहे.
वरील फेसबुक पोस्ट येथे पाहता येईल.
वरील फेसबुक पोस्ट येथे पाहता येईल.
livehindustan.com ने 8 जानेवारी 2022 रोजी प्रकाशित केलेल्या लेखानुसार, उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात होणार आहेत. 10 फेब्रुवारी 2022 पासून निवडणूक सुरू होईल आणि 10 मार्च 2022 रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.
लेखानुसार, वाढत्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने रोड शो आणि रॅलींवर बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाने डिजिटल, व्हर्च्युअल आणि मोबाईलच्या माध्यमातून प्रचार करावा, असे म्हटले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये हिंदू आणि मुस्लिम एकजुटीने काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचा दावा करणारा एक फोटो शेअर करण्यात आला आहे.
‘उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लिम एकत्र येत काॅंग्रेसचे समर्थन करत आहेत’ या दाव्यासह शेअर केलेल्या फोटोमागील सत्य शोधण्यासाठी, आम्ही गूगलवर काही किवर्ड आणि रिव्हर्स इमेजचा वापर केला.
गूगल रिव्हर्स सर्च दरम्यान आम्हाला एक फेसबुक पोस्ट सापडली. मात्र या फेसबुक पोस्टच्या छायाचित्रातील पोस्टर पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्र्यांचे आहे. ममता बॅनर्जी आणि पक्ष तृणमूल काँग्रेस आहे.
मिळालेली फेसबुक पोस्ट पाहिल्यानंतर असे आढळून आले की, ‘उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लिम एकत्र येत आहेत’ असा दावा करणारे फोटो शेअर केलेल्या पोस्टरमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नाव आहे. ते तृणमूल काँग्रेसचे असावे.
यानंतर, आम्ही गुगल रिव्हर्सच्या मदतीने प्राप्त झालेल्या फेसबुक पोस्टचे चित्र शोधण्यास सुरुवात केली. यादरम्यान आम्हाला तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांचे 3 मार्च 2021 रोजीचे ट्विट मिळाले. या ट्विटमध्ये व्हायरल झालेला फोटो शेअर करून नुसरत जहाँने भाजप आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांच्यावर निशाणा साधला होता. नुसरत जहाँने व्हायरल झालेला फोटो ट्विट करत लिहिले की, प्रत्येक धर्म, जात, रंगाचे लोक ममता बॅनर्जी यांच्यासोबत उभे आहेत.
त्यानंतर आम्ही फोटोसह काही कीवर्ड वापरून हे पुन्हा गुगल केले.
या दरम्यान आम्हाला Didi Ke Bolo नावाचे एक व्हेरिफाईड फेसबुक पेज आढळले. या पेजने 2 मार्च 2021 रोजी व्हायरल झालेला फोटो शेअर केला होता.
या आधारावर, आम्हाला आढळले की ‘उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लिम एकत्र येत आहेत आणि काँग्रेसला पाठिंबा देत आहेत’ असा दावा करणारा फोटो फोटोशॉप्ड आहे.
जेव्हा आम्ही Didi Ke Bolo बद्दल माहिती गोळा केली, तेव्हा कळले की ही ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेली मोहीम आहे, ज्या अंतर्गत सरकार तुमच्या सूचना आणि समस्या जाणून घेते जेणेकरून सरकार तुमच्या समस्या सोडवू शकेल.
Read More: सचिन तेंडूलकरने पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला खांदा दिलेला नाही, चुकीचा दावा व्हायरल
अशा प्रकारे, आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, ‘उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लिम एकत्र काँग्रेसला पाठिंबा देत आहेत’ असा दावा करणारा फोटो फोटोशॉप केलेला आहेत. हा फोटो भ्रामक दावा करून शेअर केला जात आहे.
Prabir Kar Rajarhat Newtown FB Post
Self Analysis
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
April 17, 2025
Tanujit Das
April 16, 2025
Prasad S Prabhu
April 9, 2025