Friday, December 5, 2025

Fact Check

इटलीतील G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पोप यांच्यात ‘विशेष भेट’? नाही, व्हायरल व्हिडिओ 2021 चा आहे

Written By Vasudha Beri, Translated By Prasad S Prabhu, Edited By Chayan Kundu
Jun 21, 2024
banner_image

Claim
इटलीतील G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पोप यांच्यात झालेल्या विशेष भेटीचा व्हिडिओ. पोपने आमंत्रित केलेल्या जागतिक नेत्यांमध्ये भारतीय पंतप्रधान हे एकमेव होते.
Fact

हा 2021 मधील पंतप्रधान मोदी व्हॅटिकन येथे पोपना भेटतानाचा व्हिडिओ आहे. पोप फ्रान्सिस यांनी G7 शिखर परिषदेच्या निमित्ताने अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोपसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये युजर्सनी दावा केला आहे की ते इटलीतील G7 शिखर परिषदेच्या निमित्ताने झालेली त्यांची अलीकडील बैठक दर्शविते. असा दावा केला जात आहे की, सर्व जागतिक नेत्यांपैकी केवळ भारतीय पंतप्रधानांना पोपने भेटीसाठी आमंत्रित केले होते. न्यूजचेकरला हा दावा खोटा असल्याचे आढळले. हा व्हिडिओ प्रत्यक्षात 2021 मधला आहे आणि G7 शिखर परिषदेच्या दरम्यान पोपने इटली भेटीदरम्यान अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली आहे.

अनेक X आणि Facebook युजर्सनी असा दावा करत व्हिडिओ शेअर केला आहे की, “मीडिया ही गोष्ट दर्शवत नाही. इटली येथे झालेल्या G7 बैठकीला उपस्थित राहणाऱ्या सर्व राज्य प्रमुखांपैकी पोपने फक्त मोदीजींना आमंत्रित केले होते. ही आजची भारताची शक्ती आहे…” व्हाट्सअपच्या माध्यमातूनही हा दावा शेयर केला जात आहे.

अशा पोस्ट येथे, येथे आणि येथे पाहिल्या जाऊ शकतात.

Fact Check/Verification

PM मोदी पोपसोबत दाखवत असलेल्या व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सवर Google lens सर्चने आम्हाला @ANI द्वारे 30 ऑक्टोबर 2021 रोजी केलेल्या X पोस्टकडे नेले. पोस्टमध्ये व्हॅटिकनमधील अपोस्टोलिक पॅलेसमध्ये PM मोदी आणि पोप फ्रान्सिस दरम्यानची बैठक दर्शविण्यासाठी व्हायरल व्हिडिओची एक छोटी आवृत्ती अपलोड केली होती . “भारतीय पंतप्रधान आणि पोप यांच्यातील दोन दशकांहून अधिक काळातील ही पहिली भेट होती,” असे MEA ने सांगितल्याचे यामध्ये म्हटले होते.

इटलीतील G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पोप यांच्यात ‘विशेष भेट’? नाही, व्हायरल व्हिडिओ 2021 चा आहे
Screengrab from X post by @ANI

त्यानंतर आम्ही Google वर “पीएम मोदी,” “पोप,” “व्हॅटिकन” आणि “2021” हे कीवर्ड शोधले असता आम्हाला, द हिंदूने ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध केलेला रिपोर्ट मिळाला. यामध्ये मोदींच्या व्हॅटिकन भेटीचे तपशील देताना म्हटले आहे, “श्री मोदी यांनी पोपना चांदीचे कँडल स्टॅन्ड भेट स्वरूपात दिले, त्यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला होते.”

इटलीतील G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पोप यांच्यात ‘विशेष भेट’? नाही, व्हायरल व्हिडिओ 2021 चा आहे
Screengrab from The Hindu website

“श्री. मोदींनी पोप फ्रान्सिस यांना सिल्व्हर कॅन्डेलाब्रा आणि The Climate Climb: India’s strategy, actions and achievements हे पुस्तक दिले. पोपनी श्री मोदींना त्यांच्या मुख्य शिकवणी दस्तऐवजांचा संग्रह आणि एक ब्रॉन्झचे पॉट दिले ज्यामध्ये एक झाड आणि इटालियन भाषेतील शब्द “The desert will become a garden” अर्थात “वाळवंट बनेल एक बाग” असे लिहिलेले होते. असे पुढे म्हटले आहे.

आम्हाला आढळले की व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांच्या भेटीची झलक दाखवण्यासाठी 30 ऑक्टोबर 2021 मध्ये Narendra Modi यांच्या अधिकृत YouTube चॅनेलवर व्हायरल क्लिप शेअर करण्यात आली होती.

इटलीतील G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पोप यांच्यात ‘विशेष भेट’? नाही, व्हायरल व्हिडिओ 2021 चा आहे
Screengrab from YouTube video by Narendra Modi

पंतप्रधानांनी 30 ऑक्टोबर 2021 रोजी व्हॅटिकन येथे पोप यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीची छायाचित्रे देखील शेअर केली आहेत. “पोप फ्रान्सिस यांच्याशी खूप उबदार भेट झाली. मला त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि त्यांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले”, असे त्यांनी या बैठकीनंतर एका X पोस्टमध्ये म्हटले आहे.

इटलीतील G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पोप यांच्यात ‘विशेष भेट’? नाही, व्हायरल व्हिडिओ 2021 चा आहे
Screengrab from X post by @narendramodi

त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि पोप यांच्यातील भेटीचे व्हायरल फुटेज नुकत्याच झालेल्या G7 शिखर परिषदेचे नाही हे स्पष्ट झाले.

इटलीतील G7 शिखर परिषदेत पोपने जागतिक नेत्यांची भेट घेतली

इटलीमध्ये नुकत्याच झालेल्या G7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली आहे. त्यांची एकत्र छायाचित्रे शेअर करताना पंतप्रधानांनी X वर, “@G7 शिखर परिषदेच्या वेळी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. लोकांची सेवा करण्याच्या आणि आपली सृष्टी अधिक चांगली बनवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची मी प्रशंसा करतो. त्यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिले.” असे लिहिले आहे.

विशेष म्हणजे, पोप फ्रान्सिस, जे threats and promises of AI वरील विशेष सत्राला संबोधित करण्यासाठी शिखर परिषदेत होते, त्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, युक्रेनियन अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि यूएसचे जो बिडेन यांच्यासह कार्यक्रमात भाग घेतलेल्या अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली. इटलीतील G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध जागतिक नेत्यांसोबतच्या त्यांच्या बैठकींचे वृत्त अनेक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. यापैकी काही रिपोर्ट येथे, येथे आणि येथे पाहिले जाऊ शकतात.

आम्ही नरेंद्र मोदींच्या अधिकृत संकेतस्थळावर नजर टाकली, परंतु त्यांच्या आणि पोप यांच्यातील अलीकडील “विशेष” भेटीचा उल्लेख आढळला नाही. वेबसाइटवर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेची यादी आहे.

इटलीतील G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पोप यांच्यात ‘विशेष भेट’? नाही, व्हायरल व्हिडिओ 2021 चा आहे
Screengrab from Narendra Modi’s website

G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींच्या द्विपक्षीय चर्चेबद्दलच्या AIR च्या लेखातही पोपसोबतच्या कोणत्याही विशेष भेटीचा उल्लेख नाही. पंतप्रधानांचे अधिकृत X हँडल, MEA चे प्रवक्ते देखील पोपने नरेंद्र मोदींना दिलेल्या विशेष निमंत्रणाबद्दल कोणतीही माहिती देत नाहीत.

Conclusion

अशा प्रकारे आमच्या तपासात स्पष्ट झाले की, पंतप्रधान मोदी आणि पोप यांच्यात इटलीमध्ये नुकत्याच झालेल्या G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक झाली असे सांगत व्हॅटिकनचा एक जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Result: False

Sources
X Post By @ANI, Dated October 30, 2021
Report By The Hindu, Dated October 30, 2021
YouTube Video By Narendra Modi, Dated October 30, 2021
Official Website Of Narendra Modi


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
ifcn
fcp
fcn
fl
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

20,439

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage