Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सकडून दावा केला जात आहे की, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात स्वत:ला एक मोठा लुटारू म्हणून संबोधले आहे.व्हायरल क्लिपमध्ये पंतप्रधान मोदींनी, “जर माझ्या आईने मला त्या दिवशी थांबवले असते, तर आज मी एवढा मोठा लुटारू झालो नसतो” असे म्हटल्याचे दिसते.

फेसबुक पोस्ट इथे पहा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सोशल मीडियावर वेळोवेळी अनेक दिशाभूल करणाऱ्या बातम्या आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. न्यूजचेकर टीमने यापूर्वीही अशाच काही दिशाभूल करणाऱ्या बातम्यांची पडताळणी केली आहे. याचदरम्यान पुन्हा एकदा पीएम मोदींच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे या क्लिपमध्ये पंतप्रधान मोदी स्टेजवरून स्वत:ला मोठा लुटारू म्हणताना ऐकू येत आहेत. ही क्लिप ऐकून आम्हाला ती एडिट केल्याचा संशय आला, त्यानंतर आम्ही तपास सुरू केला.
तपासादरम्यान, व्हायरल क्लिप प्रथम इनव्हीड टूलच्या मदतीने काही कीफ्रेममध्ये विभागली गेली, त्यानंतर रिव्हर्स इमेज सर्चद्वारे फ्रेम शोधण्यास सुरुवात केली. या शोधादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर 5 मिनिटांचा व्हिडिओ सापडला. व्हायरल क्लिपचा संपूर्ण भाग येथे पाहता येईल. प्राप्त व्हिडिओ 10 एप्रिल 2021 रोजी YouTube चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे.
प्राप्त व्हिडिओमध्ये, पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणादरम्यान एका डाकूची कहाणी सांगत होते, जिथे त्यांनी व्हायरल क्लिपचा संदर्भ दिला. यादरम्यान पीएम मोदी या कथेत सांगतात की, “एक दरोडेखोर होता ज्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, जेव्हा दरोडेखोराला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली तेव्हा त्याने आपल्या आईला शेवटची भेटण्याची इच्छा व्यक्त केली, जेव्हा तो त्याच्या आईला भेटला तेव्हा त्याने तिच्या नाकाचा चावा घेतला. लोकांनी त्याला असे का केले असे विचारले, तेव्हा तो म्हणाला, “जेव्हा मी लहान चोरी करायचो, त्या दिवशी माझ्या आईने मला थांबवले असते तर आज मी इतका मोठा दरोडेखोर बनला नसता.”
यूट्यूबवरील कॅप्शनमध्ये माहिती देताना सांगण्यात आले आहे की, हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे आयोजित पंतप्रधान मोदींच्या रॅलीतील आहे.
त्यानंतर आम्ही रॅलीचा संपूर्ण व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली. शोधादरम्यान, आम्हाला भाजप पश्चिम बंगालच्या यूट्यूब चॅनेलवर सिलीगुडीमध्ये आयोजित पंतप्रधान मोदींच्या रॅलीचा संपूर्ण व्हिडिओ सापडला. येथे देखील 10 एप्रिल 2021 रोजी व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. प्राप्त झालेल्या व्हिडिओमध्ये 1 तास 10 सेकंदांनंतर व्हायरल क्लिप ऐकू येते.
अशाप्रकारे पडताळणीत सापडलेल्या तथ्यांवरून स्पष्ट होते की, सिलीगुडी शहरात आयोजित सभेदरम्यान पंतप्रधान मोदींच्या भाषणाची ही व्हिडिओ क्लिप एटिड करुन चुकीच्या दाव्याने शेअर केली जात आहे.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
JP Tripathi
December 9, 2025
Salman
October 31, 2025
Prasad S Prabhu
September 27, 2025