भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो शेअर केला आहे, कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान मोदी आयएएस आरती डोगरा यांच्या पाया पडले तसेच आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. दाव्यानुसार, आरती डोगरा या काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या मुख्य वास्तुविशारद आहेत.
संग्रहित ट्विट इथे पहा.
NEWSNATION मधील वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 आणि 14 डिसेंबर रोजी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट श्रीकाशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन केले. तेव्हापासून काशी कॉरिडॉर आणि पंतप्रधान मोदींच्या वाराणसी दौऱ्याशी संबंधित अनेक मजकूर सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे. याचदरम्यान, भाजपच्या प्रवक्त्या सायना एनसी यांनी पंतप्रधानांचा एक फोटो शेअर करत दावा केला आहे की पंतप्रधान मोदींनी आयएएस आरती डोगरा यांच्या पायांना स्पर्श केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
हा व्हायरल दावा ट्विटरवर इतर अनेक युजर्सनी देखील शेअर केला आहे.
संग्रहित ट्विट्स इथे, इथे आणि इथे पाहता येईल.
हा व्हायरल दावा अनेक युजर्सनी फेसबुकवर शेअरही केला आहे.


फेसबुक पोस्ट्स इथे आणि इथे पाहता येईल.
Fact Check/ Verification
‘पंतप्रधान मोदींनी आयएएस आरती डोगरा यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले’ या दाव्यासह सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही पडतालणी सुरू केली. यासाठी आम्ही प्रथम गूगल इमेज रिव्हर्सचा आधार घेतला. या दरम्यान, आम्हाला ZEE NEWS ची 16 डिसेंबर रोजीची फोटोशी संबंधित एक बातमी मिळाली. यात तोच फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे, जो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

ZEE NEWS ने प्रकाशित केलेल्या लेखानुसार, PM मोदी 13 आणि 14 डिसेंबर रोजी वाराणसी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्यानंतरच शिखा रस्तोगी नावाची दिव्यांग महिला पंतप्रधान मोदींना भेटायला आली. महिलेला पाहताच पंतप्रधानांनी तत्काळ तिची विचारपुस केली. स्वतःची ओळख करून देत, ती पंतप्रधानांचे आशीर्वाद घेण्यासाठी पुढे गेल्यावर पंतप्रधानांनी तिला थांबवले आणि तिच्या पायाला स्पर्श केला.

या माहितीची पुष्टी करण्यासाठी, आम्ही काही कीवर्डच्या मदतीने गुगलवर वर शोध सुरू केला. या दरम्यान आम्हाला अनेक मीडिया रिपोर्ट्स प्राप्त झाले. आम्हाला न्यूज18 आणि अमर उजाला ने अनुक्रमे 14 आणि 16 डिसेंबर रोजी प्रकाशित केलेल्या बातम्या मिळाल्या.
न्यूज 18 च्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी दौऱ्यात त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन केले. यादरम्यान एका दिव्यांग महिलेने त्यांना भेटून त्यांच्या पायाला स्पर्श करण्यास सुरुवात केली, मात्र पंतप्रधानांनी त्या महिलेला पाय स्पर्श करण्यापासून रोखले आणि स्वत: तिच्या पायाला स्पर्श करण्यास सुरुवात केली. शिखा असे या महिलेचे नाव होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिखाशी बोलून तिच्या प्रकृतीबद्दल जाणून घेतले.


कोण आहे शिखा रस्तोगी?
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, 40 वर्षीय शिखा रस्तोगी वाराणसीतील सिग्रा येथील रहिवासी आहेत. त्या जन्मापासूनच दिव्यांग आहेत. शिखा यांनी घरी राहून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना नृत्याची खूप आवड आहे. त्या स्वतः नृत्य करतात आणि इतरांनाही शिकवतात. वाराणसीतील काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी शिखा दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींना भेटल्या आणि पंतप्रधानांनी त्यांना पाहताच ओळखले. त्यादरम्यान पंतप्रधानांनी त्यांच्या पायाला स्पर्श करून तब्येतीविषयी विचारली तसेच शिखाला सांगितले की विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये तिच्यासाठी एक दुकान देखील देण्यात आले आहे.

जाणून घ्या कोण आहेत आरती डोगरा?
अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तराखंडमधील डेहराडून येथे जन्मलेल्या आरती डोगरा 2006 च्या बॅचच्या महिला आयएएस अधिकारी आहे. त्याची उंची सुमारे साडेतीन फूट आहे. आरती डोगरा यापूर्वी डिस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या, नंतर त्यांना अजमेरचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. आरतींनी उत्तराखंडमध्येच शिक्षण पूर्ण केले. अभ्यासादरम्यान त्यांची भेट त्यावेळी आयएएस अधिकारी मनीषा पनवार यांच्याशी झाली, त्यांनी आरतींना मार्गदर्शन केले होते. त्यानंतर त्यांनी आयएएस होण्याचा निश्चय केला. आरती डोगरा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती.
जाणून घ्या काशी विश्वनाथ धामचे मुख्य शिल्पकार कोण आहेत?
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट काशी विश्वनाथ कॉरिडॉरची ब्लू प्रिंट अहमदाबादचे रहिवासी पद्मश्री डॉ बिमल पटेल यांनी तयार केली होती. बिमल पटेल हे अहमदाबादमधील सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजीचे (CEPT) अध्यक्ष आहेत. 2019 मध्ये त्यांना वास्तुकला आणि नियोजन क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Conclusion:
सोशल मीडियावर ‘पीएम मोदींनी आयएएस आरती डोंगराच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला’ हा दावा खोटा असल्याचे मीडिया रिपोर्ट्सवरून स्पष्ट झाले आहे. पीएम मोदी आशीर्वाद घेत असल्याचा दावा करत शेअर केलेला फोटो आयएएस आरती डोगरांचा नसून शिखा रस्तोगी नावाच्या दुस-या दिव्यांग महिलेचा आहे.
Result: Misleading
Sources:
Media Reports:
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.