Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
कर्नाटकमध्ये चहाचा आस्वाद घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
Fact
हा दावा दिशाभूल करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा एक वर्ष जुना व्हिडिओ वाराणसीतील आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या कामकाजादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पीएम मोदी चहाच्या स्टॉलवर चहा पीत आहेत. व्हिडिओ शेअर करून तो कर्नाटकचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
वास्तविक, कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने 104 जागा जिंकल्या होत्या. यावेळी कर्नाटक निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेससह इतर अनेक पक्ष पूर्ण प्रयत्न करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारपासून कर्नाटकमधील निवडणूक प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहेत.
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही Invid टूलच्या मदतीने व्हायरल व्हिडिओचे काही मुख्य फ्रेम्स काढले. कीफ्रेम रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला मार्च 2022 मध्ये नरेंद्र मोदींच्या अधिकृत YouTube चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. व्हायरल झालेल्या व्हिडीओचा काही भाग या व्हिडिओमध्ये पाहता येतो. व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, हा पीएम मोदींचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथील एका चहाच्या दुकानाचा व्हिडिओ आहे.
पीएम मोदींचा हा व्हिडीओ अनेक मीडिया हाऊसनी त्यांच्या रिपोर्ट्समध्ये प्रकाशित केला आहे, जो इथे आणि इथे पाहता येईल. या रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ 2022 सालातील यूपी विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यानचा आहे.
याशिवाय, ‘आज तक’ वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वाराणसीतील प्रसिद्ध ‘पप्पू के चाय की दुकान’मध्ये पीएम मोदींनी चहाचा आस्वाद घेतला. वाराणसीतील अस्सी घाटाजवळ असलेले हे दुकान विश्वनाथ सिंह उर्फ पप्पू यांचे असल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. यावेळी त्यांची मुले दुकानात हजर होती. 15 मिनिटे उपस्थित पंतप्रधान मोदींनी लोकांसोबत चहाचा आस्वाद घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
शिवाय, आम्हाला व्हायरल व्हिडिओमध्ये असेही आढळले की चायवाला त्यांनी पीएम मोदींसोबत शेअर केलेल्या अनुभवांबद्दल बोलत आहे. हा भाग शोधण्यासाठी आम्ही YouTube वर कीवर्ड सर्च केले. आम्हाला स्ट्रीट फूड मॅनिया नावाच्या YouTube चॅनेलने एप्रिल 2022 मध्ये अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. व्हायरल व्हिडिओच्या या भागात एक चायवाला पीएम मोदींसोबत शेअर केलेल्या अनुभवांबद्दल बोलत आहे.
व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हे तेच पप्पू चाय वालेचे दुकान आहे जिथे गेल्या वर्षी यूपी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पीएम मोदींनी चहा घेतला होता. व्हिडिओनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि समाजवादी पक्षाचे सुप्रीमो अखिलेश यादव यांनीही यापूर्वी या दुकानात चहाचा आस्वाद घेतला आहे.
अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चहा पितानाचा व्हिडिओ कर्नाटकचा असल्याचा दावा दिशाभूल करत शेअर केला जात आहे.
Our Sources
Video Uploaded by Narendra Modi’s Youtube channel in March 2022
Report Published by ‘AAJ Tak‘ in March 2022
Video Uploaded by Street Food Mania’s Youtube channel in April 2022
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी शुभम सिंग यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
June 21, 2025
Vasudha Beri
June 19, 2025
Prasad S Prabhu
June 14, 2025