Monday, August 15, 2022
Monday, August 15, 2022

घरFact Checkपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिसिव्ह करण्यासाठी रोमने टॅक्सी पाठविली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिसिव्ह करण्यासाठी रोमने टॅक्सी पाठविली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्यामध्ये दोन फोटो व्हायरल होत आहेत. दोन्ही फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाहनातून उतरताना दिसत असून कारच्या वर आणि मागे टॅक्सी असे लिहिलेले आहे. फोटो शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॅटिकन टॅक्सीने पोहोचल्याचा दावा केला जात आहे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 85 गाड्यांच्या ताफ्यासह रोममध्ये दाखल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिसिव्ह करण्यासाठी रोमने टॅक्सी पाठवली.

फेसबुक पोस्टचा स्क्रिनशाॅट

Fact Check/Verification

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोममध्ये आयोजित 16 व्या G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी  29 ऑक्टोबर रोजी इटलीची राजधानी रोम येथे पोहोचले. रोमला पोहोचल्याची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केली आहे.


 पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान तेथे होते. रोम, इटली येथे G20 देशांच्या प्रमुखांच्या बैठकीला संबोधित करण्याव्यतिरिक्त ते इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचीही भेट घेणार आहेत. यानंतर ते पोप फ्रान्सिस यांना भेटण्यासाठी व्हॅटिकनला जाणार होते.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांच्या व्हॅटिकन दौऱ्याचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. व्हायरल पोस्टमध्ये दोन भिन्न फोटो वापरण्यात आले आहेत.

दोन्ही फोटो पाहता हे स्पष्ट होते की, पीएम मोदींच्या वाहनाच्या ताफ्यात समाविष्ट असलेली फोक्सवॅगन कारचा (ज्यामध्ये पीएम मोदी बसले होते) फोटो एडिट करुन त्यावर टॅक्सी स्टँड लावण्यात आला आहे.

एएनआयच्या ट्विटर हँडलवरून 30 ऑक्टोबर 2021 रोजी शेअर केलेल्या  फोटोंमध्ये आम्हाला हे फोटो आढळून आले.

दोन्ही फोटो पाहता हे व्हायरल फोटो एडिट केलेले असल्याचे स्पष्ट दिसते.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पोप फ्रांसिस यांच्या भेटीला टॅक्सीने गेले नव्हते, त्यांचा कारचा फोटो एडिट करण्यात आला आहे.

Result: Fabricated

Source

ANI: https://twitter.com/ANI/status/1454355693142564865/photo/1

ANI: https://twitter.com/ANI/status/1454335010438144009


Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular