Authors
(मूळतः हे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख Shubham Singh याने लिहिला आहे)
Claim
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यात दावा केलाय की, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या घरी पार्टी केली. या व्हिडिओत अर्णब गोस्वामी नाचताना दिसत आहे. आठवड्याभरापासून चाललेल्या राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
Fact
या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही यु ट्यूबवर ‘अर्णब गोस्वामी डान्स’ असा कीवर्ड टाकून शोधले. त्यावेळी आम्हांला आरएसपी नावाच्या यु ट्यूब वाहिनीवर ८ मार्च २०२१ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला. त्या व्हिडिओनुसार, ‘अर्णब गोस्वामी बोलो तारा रारा’ गाण्यावर नाचत आहे. या व्हिडिओत व्हायरल व्हिडिओतील काही भाग दिसत आहे.
या व्यतिरिक्त आम्हांला अन्य काही सोशल मीडियावर युजर आणि यु ट्यूब वाहिन्यांवर एक वर्षांपूर्वीचा अर्णब गोस्वामी यांचा व्हिडिओ वेगवेगळ्या शीर्षकासोबत अपलोड केला होता.
ट्विटरवर काही कीवर्ड टाकल्यावर आम्हांला vibgyor_Premila नावाच्या ट्विटर खात्यावर ९ जून २०१७ रोजी केलेले एक ट्विट मिळाले. ज्यात व्हायरल व्हिडिओ अगदी मिळता-जुळता व्हिडिओ अपलोड केला होता.
आम्ही काही कीवर्ड टाकल्यावर अरविंद नायर नावाच्या यु ट्यूब वाहिनीवर ११ फेब्रुवारी २०१० अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला. या व्हिडिओत ३ मिनिटे ३० सेकंदांपासून व्हायरल व्हिडिओ आपण पाहू शकतो. व्हिडिओच्या शीर्षकानुसार, हा व्हिडिओ ‘टाइम्स नाऊ’च्या लाँच पार्टीचा आहे.
अर्णब गोस्वामी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर कधीपासून आहे, याची माहिती आम्हांला मिळू शकलेली नाही. पण हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ इंटरनेटवर २०१० पासून उपलब्ध आहे. या व्हिडिओचा उद्धव ठाकरे यांच्या राजीनामा देण्याच्या गोष्टीशी कोणताही संबंध नाही.
Result : False
जर तुम्हांला माझी तथ्य पडताळणी आवडत असेल तर असेच विविध लेख या दुव्यावर टिचकी मारून तुम्ही वाचू शकता.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.