Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केलाय की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना टिळक लावून आशिर्वाद देत आहे.
ट्विटरवर हा फोटो शेअर करत त्यात लिहिलंय की,”जुन्या फोटोत, बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना टिळक लावून आशिर्वाद देत आहे.”
(मूळ इंग्रजी पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.
गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण अगदी ढवळून निघाले आहे. सध्या एकनाथ शिंदे ४७ आमदारांसह गुवाहाटीतील हॉटेलमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच आता सोशल मीडियावर जुना फोटो शेअर करत दावा केला जातोय की, बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना टिळक लावून आशिर्वाद देत आहे.
Fact Check/Verification
बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना टिळक लावून आशिर्वाद देत आहे, या फोटोची पडताळणी करण्यासाठी आम्ही ट्विटरवर ‘धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब’ असं टाकून शोधले. त्यावेळी आम्हांला शिवसेना या अधिकृत ट्विटर खात्यावर व्हायरल फोटो मिळाला. २६ ऑगस्ट २०२१ रोजीच्या त्या ट्विटमध्ये लिहिलंय की,”धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृती प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात कायम आहेत. त्यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.”
(या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता)
सध्या एकनाथ शिंदेंसोबत आनंद दिघे यांचे नाव देखील चर्चेत आहे. नव्वदीच्या दशकात आनंद दिघे यांचा प्रवास शिवसेनेच्या एका सामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झाला. त्यानंतर ते ठाणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख झाले. त्यांनी टेंभी नाका परिसरात आनंद आश्रमाची स्थापना केली. त्या आश्रमात रोज सकाळी जनता दरबार भरायचा. फ्रंटलाईन या मासिकात आनंद दिघे यांच्या संदर्भातील लेखामध्ये त्यांच्या नेतृत्वाचे वर्णन करताना ‘दिघेंनी कोणतीही निवडणूक लढवली नसली किंवा कोणत्याही पदाची अभिलाषा बाळगली नसली तरी ते ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ झाले होते’, असे मत मांडण्यात आले होते.
त्याचबरोबर आम्हांला शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या अधिकृत ट्विटरवर देखील हाच फोटो मिळाला. २७ जानेवारी २०२२ रोजीच्या ट्विटमध्ये लिहिलंय,”शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे बिनीचे शिलेदार, अफाट जनसंपर्काचे आणि लोकप्रियतेचे धनी, धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.”
(या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता)
त्याचबरोबर आम्हाला २१ जानेवारी २०१९ रोजीचा बीबीसी मराठीचा लेख मिळाला. यात देखील या व्हायरल फोटोचा समावेश आहे. त्या फोटोच्या शीर्षकात ‘बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे’ लिहिलेलं आहे.
या व्यतिरिक्त आम्हांला लोकमतच्या अधिकृत यु ट्यूब वाहिनीवर एक व्हिडिओ मिळाला. ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ असं आनंद दिघे यांना का म्हटलं जायचं? हे त्याचे शीर्षक आहे. त्या व्हिडिओत देखील हा व्हायरल फोटो आनंद दिघे यांचा असल्याचे म्हटले आहे.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकनाथ शिंदेंना नाही तर आनंद दिघे यांना टिळक लावून आशिर्वाद देत आहे.
Result : False
Our Sources
२६ ऑगस्ट २०२१ रोजी शिवसेना या अधिकृत ट्विटर खात्याने केलेले ट्विट
२७ जानेवारी २०२२ रोजी शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी केलेले ट्विट
२१ जानेवारी २०१९ रोजीचा बीबीसी मराठी लेख
२२ एप्रिल २०२२ रोजी लोकमतने अपलोड केलेला यु ट्यूब व्हिडिओ
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
April 5, 2025
Vasudha Beri
April 1, 2025
Prasad S Prabhu
December 6, 2024