Thursday, February 9, 2023
Thursday, February 9, 2023

घरFact CheckPoliticsफोटोत रिक्षाजवळ उभे असलेले व्यक्ती हे खरंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे? चुकीचा...

फोटोत रिक्षाजवळ उभे असलेले व्यक्ती हे खरंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे? चुकीचा दावा व्हायरल

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, जुन्या फोटोत रिक्षाजवळ उभे असलेले व्यक्ती हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे.

फेसबुकवर हा फोटो शेअर केला जात आहे. हेमंत मेरुकर या फेसबुक युजरने फालतुगिरी या फेसबुक पानाची पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये लिहिलंय की,”एका रिक्षाचालकाने घरकोंबड्याला खुराडातून रस्त्यावर आणला…”

फोटो साभार : Facebook/Hemant Merukar
फोटो साभार : Facebook/Sanjeev Koparde
फोटो साभार : Facebook/page/Marathi

ट्विटरवर देखील हा फोटो शेअर केला जात आहे.

फोटो साभार : [email protected]_indrjeet

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द रिक्षाचालक ते शाखाप्रमुखापासून सुरवात झाली. १९८४ मध्ये धर्मवीर आनंद दिघे यांनी किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांना नियुक्त केले. आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यातच आता सोशल मीडियावर फोटो शेअर करत दावा केला जातोय की, जुन्या फोटोत रिक्षाजवळ उभे असलेले व्यक्ती हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे.

Fact Check / Verification

सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या जुन्या फोटोत रिक्षाजवळ उभे असलेले व्यक्ती हे एकनाथ शिंदे आहे, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्सच्या मदतीने हा फोटो शोधला. तेव्हा आम्हांला शबनम न्यूजची २५ जुलै २०२२ रोजीची एक बातमी मिळाली. त्या बातमीनुसार, हा फोटो एकनाथ शिंदे यांचा नसून पिंपरी-चिंचवड शहरातील बाबा कांबळे यांचा आहे. 

फोटो साभार : Shabnam News

त्याचबरोबर आम्हांला २५ जुलै २०२२ रोजीची सकाळची बातमी मिळाली. त्यात देखील हा फोटो एकनाथ शिंदे यांचा नसून महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांचा असल्याचे सांगितले आहे. व्हायरल फोटोतील रिक्षाचा नंबर एमएच १४ – ८१७२ आहे. एमएच १४ हा पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाचा क्रमांक आहे. खरंतर तरुणवयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रिक्षाचालक असल्याने त्यांनी दाढी राखली होती. त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसत आहे. पण ते एकनाथ शिंदे नसून बाबा कांबळे आहे.

फोटो साभार : Esakal

बाबा कांबळे यांनी १९९७ मध्ये रिक्षाचालक होण्याचे ठरवले. त्यावेळी त्यांनी स्वतःची रिक्षा घेऊन परमिट काढले. त्यांनी बाबा आढाव, शरद राव या कामगार नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. कष्टकरी कामगार पंचायत, टपरी-पथारी हातगाडी पंचायत, बांधकाम कामगार पंचायत, हमाल-माथाडी कामगार संघटना यांचे ते अध्यक्ष आहे. त्यानंतर आम्हांला २४ जुलै २०२२ रोजी लोकमत वृत्तपत्रात प्रकाशित झालेला एक लेख मिळाला. त्याचे शीर्षक ‘राजकारणात मिरवतोय रिक्षावाला’ असे होते. यात देखील हा व्हायरल फोटो बाबा कांबळे यांचा असल्याचे समजते.

फोटो साभार : Lokmat

या व्यतिरिक्त आम्ही बाबा कांबळे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले,”व्हायरल होणारा फोटो माझाच आहे. १९९७ मध्ये पिंपरी चौकात रातराणी थांबा सुरू झाला. त्यावेळीचा हा फोटो आहे.”

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, व्हायरल फोटोत रिक्षाजवळ उभे असलेले व्यक्ती हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसून ते पिंपरी चिंचवड शहरातील बाबा कांबळे आहे. हा फोटो १९९७ मधील आहे.

Result : False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular