Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckPoliticsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे खरंच दुर्लक्ष केले?...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे खरंच दुर्लक्ष केले? भ्रामक दावा व्हायरल

याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख सौरभ पांडे यांनी लिहिला आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केला जातोय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिवादनाला प्रतिसाद न दिल्याने त्यांचा अपमान केला. 

फेसबुकवर अक्षय बेरड या युजरने प्रशांत बाळासाहेब दौंडकर यांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले,”भारताचे मावळते राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद साहेब हे प्रधानमंत्री मोदी साहेबांना नमस्कार करत असताना श्री. मोदी साहेबांनी श्री. कोविंद साहेबांच्या कडे “बघू नये” एवढी वाईट अवस्था भाजप मध्ये राष्ट्रपतींची आहे.”

फोटो साभार : Facebook/अक्षय बेरड
फोटो साभार : Facebook/Rahul Mohire

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २५ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २५ जुलै २०१७ रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती. 

परंपरेनुसार, पंतप्रधान मोदी यांनी माजी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ निरोप समारंभ आयोजित केला होता. या व्यतिरिक्त संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्येही माजी राष्ट्रपतींचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यातच आता सोशल मीडियावर युजर हा व्हिडिओ शेअर करत दावा करतायेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिवादनाला प्रतिसाद न दिल्याने त्यांचा अपमान केला. 

Fact Check / Verification

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिवादनाला प्रतिसाद न दिल्याने त्यांचा अपमान केला, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही कीफ्रेम गुगलवर टाकून शोधल्या. तेव्हा आम्हांला अन्य काही दाव्यांव्यतिरिक्त कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. 

फोटो साभार : Google Search Result

त्यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओतील संसद टीव्ही या बोधचिन्हाच्या आधारे त्यांची यु ट्यूब वाहिनी शोधली. या प्रक्रियेत आम्हांला २३ जुलै २०२२ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला, त्यात व्हायरल व्हिडिओ देखील होता. 

फोटो साभार : YouTube/Sansad TV

हा व्हिडिओ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित केलेल्या निरोप समारंभाचा आहे. यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेतेही उपस्थित होते. संसद टीव्हीने अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये १० सेकंदानंतर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व्यासपीठावरून खाली उतरून उपस्थित मान्यवरांना भेटतांना दिसत आहे. याच व्हिडिओमध्ये ५७ सेकंदानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अभिवादन करतांना दिसत आहे. पण १ मिनिट १ सेकंदानंतर माजी राष्ट्रपती पंतप्रधान मोदींसमोर उभे राहून इतरांना अभिवादन करतात, तेव्हा पंतप्रधान दुसरीकडे पाहतात. 

भारताचे राष्ट्रपती यांच्या ट्विटर खात्यावरून या कार्यक्रमाचे विविध फोटो शेअर केले आहे. त्यात पंतप्रधान मोदी हे रामनाथ कोविंद यांना अभिवादन करतांना दिसत आहे. 

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिवादनाला प्रतिसाद न दिल्याने त्यांचा अपमान केल्याचा दावा भ्रामक आहे. खरंतर व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान आणि माजी राष्ट्रपती यांच्यातील अभिवादनाचा तोच भाग दिसत आहे, ज्यात माजी राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना अभिवादन केले. पण काही क्षणांपूर्वी पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपतींना केलेल्या अभिवादनाचा भाग काढून टाकण्यात आला आहे. 

Result : Partly False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular