Wednesday, August 10, 2022
Wednesday, August 10, 2022

घरFact CheckPoliticsजम्मूमध्ये खरंच नुपूर शर्माच्या समर्थनार्थ लोकं एकत्र जमले होते? याचे सत्य जाणून...

जम्मूमध्ये खरंच नुपूर शर्माच्या समर्थनार्थ लोकं एकत्र जमले होते? याचे सत्य जाणून घ्या

(याची मूळ तथ्य पडताळणी न्यूजचेकर हिंदीने केली आहे आणि हा लेख Arjun Deodia याने लिहिला आहे)

माजी भाजपाच्या नेत्या नुपूर शर्मा यांच्या संबंधित सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, जम्मूमध्ये हिंदूंनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ रॅली काढली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत रस्त्यावर भगव्या झेंडे घेऊन जाणाऱ्या लोकांची एक मोठी रॅली दिसत आहे.

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा इथे वाचू शकता.

फोटो साभार : Facebook/Avinash Shukla

या व्हायरल व्हिडिओच्या शीर्षकात लिहिले आहे,”नुपूर शर्माच्या समर्थनार्थ जम्मूतील हिंदू एकत्र आले. आता हिंदूंची एकता आणि ताकत विश्वाला समजेल.” या शीर्षकासह हा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर हजारो लोकांनी शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा पैगंबर मोहम्मद यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे प्रकरण अरब देशांपर्यंत पोहोचले. अनेक अरब देशांनी नुपूर शर्माच्या त्या विधानाचा निषेध व्यक्त केला. 

त्यानंतर भाजपाने नुपूर शर्माची पक्षातून हकालपट्टी केली. अनेक जण नुपूर शर्माच्या विधानाचा निषेध करत आहे पण त्याचबरोबर काही लोकं तिचे समर्थनही करत आहे. त्यातच आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Fact Check / Verification

जम्मूमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ खरंच रॅली काढली होती, याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही व्हायरल झालेला व्हिडिओ इन-विड टूलच्या मदतीने शोधला. तेव्हा आम्हांला हा व्हिडिओ आरएसएस नोएडा या एका फेसबुक पानावर मिळाला. या पानावर हा व्हिडिओ १८ एप्रिल २०२२ रोजी अपलोड केला होता.

या व्हिडिओच्या शीर्षकात हनुमान जन्मोत्सव आणि रामनवमीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर काही कीवर्ड टाकून शोधल्यावर आम्हांला समजले की, १७ आणि १८ एप्रिल २०२२ रोजी काही लोकांनी हा व्हिडिओ युपीतील नोएडाचा सांगत शेअर केला होता. 

जन जोश न्यूज नावाच्या एका यु ट्यूब वाहिनीने या मिरवणुकीचे वेगवेगळे व्हिडिओ नोएडाचे सांगत शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओ देखील दिसत आहे. या व्यतिरिक्त नोएडामध्ये काढलेल्या या मिरवणुकीसंदर्भात त्यावेळी न्यूज १८ ने देखील बातमी दिली होती. ही मिरवणूक १७ एप्रिलला काढण्यात आली होती. एक दिवसापूर्वीच दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये मिरवणुकीदरम्यान हिंसा घडली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नोएडात कडेकोट बंदोबस्तात मिरवणूक काढण्यात आली. 

आताच्या बातमीनुसार, नुकतेच नुपूर शर्माच्या समर्थनार्थ हैदराबाद, दिल्ली आणि वाराणसीमध्ये रॅली काढण्यात आल्या, पण व्हायरल व्हिडिओचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, नुपूर शर्माच्या समर्थनार्थ शेअर केला जाणारा व्हायरल व्हिडिओ जम्मूचा नसून युपीतील नोएडाचा आहे. तसेच हा व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वीचा आहे. 

Result : False Context/False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular