Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
नाशिकमध्ये मंचावर विठ्ठलाची मूर्ती स्वीकारण्यास राहुल गांधींनी नकार दिला.
Fact
नाही, व्हायरल दावा खोटा आहे.
राहुल गांधींच्या जाहीर सभेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती विठ्ठलाची मूर्ती घेऊन त्यांच्यासमोर उभी असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील नाशिकमधील एका काँग्रेस कार्यकर्त्याने भेट स्वरूपात आणलेली भगवान विठ्ठलाची मूर्ती स्वीकारण्यास राहुल गांधींनी नकार दिल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की व्हायरल दावा खोटा आहे. नाशिक येथील जाहीर सभेत व्यासपीठावर लोकांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर राहुल गांधी यांनी त्या व्यक्तीकडून मूर्ती स्वीकारली होती.
व्हायरल व्हिडिओ सुमारे 31 सेकंदांचा आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती राहुल गांधींना फेटा घालताना दिसत आहे, तर त्यांच्या शेजारी आणखी एक व्यक्ती विठ्ठलाची मूर्ती घेऊन उभा असलेला दिसत आहे. जेव्हा त्या व्यक्तीने राहुल गांधींना मूर्ती भेट देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याला थोडे मागे ढकलले. यानंतर राहुल गांधींना पुष्पहार घालण्यात आला.
व्हायरल दाव्याच्या कॅप्शनसह व्हिडिओ शेअर केला गेला आहे ज्यामध्ये असे लिहिले आहे, “महाराष्ट्र के नासिक में एक कांग्रेस का कार्यकर्ता भगवान विट्ठल की मूर्ति राहुल गांधी को देने की बहुत कोशिश किया. लेकिन राहुल गांधी उसे हाथों से धक्का देकर दूर कर देते थे और मूर्ति लेने से इनकार कर दिया कार्यकर्ता ने कुल 9 बार कोशिश की लेकिन हर बाल राहुल गांधी ने अस्वीकार कर दिया. यह ईसाई परिवार हिंदू धर्म से बेहद नफरत करता है”.

भाजप नेते आणि आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून हा दावा केला आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यासाठी Newschecker ने सर्वप्रथम राहुल गांधींच्या नाशिक येथील कार्यक्रमाचा व्हिडिओ शोधला. या दरम्यान, आम्हाला 14 मार्च 2024 रोजी राहुल गांधींच्या अधिकृत यूट्यूब अकाउंटवरून लाइव्ह केलेला व्हिडिओ मिळाला.

सुमारे 1 तास 17 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे 17 मिनिटानंतर पाहता येईल. त्या भागाचा पुढचा आणि मागचा भाग पाहिल्यावर लक्षात आले की, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नाशिकला पोहोचली तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बाजार समितीच्या लोकांनी राहुल गांधी यांचा सत्कार केला. सत्कारादरम्यान राहुल गांधी यांना प्रथम फेटा बांधून नंतर काही लोकांनी पुष्पहार घातला. त्यानंतर राहुल गांधी यांनी तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आणलेली विठ्ठलाची मूर्ती स्वीकारली.
मात्र, यावेळी आम्हाला असेही आढळून आले की, राहुल गांधी यांना फेटा आणि हार घातला जात असताना त्या व्यक्तीने मध्येच मूर्ती भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र मंचावर उपस्थित असलेल्या इतर लोकांनी त्याला मागे ढकलले. यानंतर पिवळे कपडे घातलेल्या व्यक्तीने पुन्हा राहुल गांधींना मूर्ती सादर केली, जी राहुल गांधींनी स्वीकारली.
तपासादरम्यान, आम्हाला महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी 14 मार्च रोजी ट्विट केलेला व्हिडिओ देखील सापडला. नाना पटोले यांनी भाजप महाराष्ट्राच्या एका ट्विटला उत्तर म्हणून हा व्हिडिओ शेयर केला होता, संबंधित पोस्टने राहुल गांधींनी विठ्ठलाची मूर्ती स्वीकारण्यास नकार दिल्याचा दावा केला होता.

नाना पटोले यांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओमध्ये राहुल गांधींनी पिवळे कपडे घातलेल्या व्यक्तीने दिलेली मूर्ती स्वीकारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. नाना पटोले यांनीही व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये व्हायरल झालेल्या दाव्याचे खंडन केले होते.
यानंतर आम्ही राहुल गांधींना विठ्ठलाची मूर्ती भेट म्हणून देऊ केलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, आम्ही राहुल गांधींच्या यूट्यूब अकाउंटवरून अपलोड केलेला 1 तास 17 मिनिटांचा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. त्याच व्यक्तीने मंचावर उपस्थित शिवसेना नेते संजय राऊत यांचा सत्कार केल्याचे आढळून आले. मंचावरून समाधान जामदार असे त्या व्यक्तीचे नाव पुकारले गेल्याचे आमच्या निदर्शनास आले. तुम्ही ते 18 मिनिटे 30 सेकंद ते 19 मिनिटे 30 सेकंदांदरम्यान ऐकू आणि पाहू शकता.

आता समाधान जामदार यांचे फेसबुक अकाउंट शोधले. आम्हाला त्याचे फेसबुक खाते सापडले. फेसबुक अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार समाधान जामदार हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत.

तपासादरम्यान आम्ही काँग्रेस नेते समाधान जामदार यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओचे संपूर्ण सत्य सांगितले. समाधान जामदार म्हणाले, “राहुल गांधींना फेटा बांधला जात असताना मी त्यांना विठ्ठलाची मूर्ती भेट देण्यासाठी गेलो होतो. फेटा बांधल्यानंतर मी त्यांना मूर्ती देण्याचा प्रयत्न केला तेव्हा राहुल गांधींसोबत फोटो काढत असलेल्या फेटा बांधलेल्या व्यक्तीने मला थोडा वेळ थांबण्यास सांगितले. यानंतर राहुल गांधींना पुष्पहार घालण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी माझ्याकडून मूर्ती घेतली.
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट झाले कि, राहुल गांधींनी विठ्ठलाची मूर्ती स्विकारण्यास नकार दिला नसून, पुष्पहार घातल्यानंतर त्यांनी मूर्ती स्वीकारली आहे. दरम्यान व्हायरल दावा खोटा आहे.
Our Sources
Video Streamed by Rahul Gandhi Youtube account on 14th March 2024
Video Tweeted by Nana Patole X account on 14th March 2024
Telephonic Conversation with Samadhan Jamdar
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
December 13, 2025
Vasudha Beri
December 11, 2025
Prasad S Prabhu
November 29, 2025