Authors
Claim
एबीपी न्यूजची ग्राफिक प्लेट शेअर करीत दावा केला जात आहे की, राहुल गांधींनी त्यांचे पूर्वज आणि स्वतःला मुस्लिम म्हणवून घेतले आहे. राहुल गांधींनी काँग्रेसला मुस्लिमांचा पक्ष म्हटले आहे, असेही पोस्टमध्ये लिहिले आहे.
Fact
राहुल गांधींबद्दल व्हॉट्सअपवर शेअर केलेली ही ग्राफिक प्लेट यापूर्वीही अनेकदा व्हायरल झाली होती. न्यूजचेकरने त्यावेळी हा दावा खोडून काढला होता. आमच्या तपासणीत एबीपी माझाचा हा स्क्रीनशॉट बनावट असल्याचे आढळून आले. तपासादरम्यान, आम्हाला 2018 मध्ये एबीपी या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हँडलद्वारे शेअर केलेले ट्विट आढळले. या ट्विटद्वारे ABP ने राहुल गांधींचे वक्तव्य सांगून शेअर केल्या जाणाऱ्या ग्राफिक प्लेटला बनावट असल्याचे सांगितले होते.
अशाप्रकारे, आमच्या तपासात असे आढळून आले आहे की राहुल गांधींचे विधान असे सांगत पुन्हा एकदा एबीपी न्यूजची बनावट ग्राफिक प्लेट शेअर केली जात आहे.
Result- False
Our Sources
ABP Tweet Post On Nov 12, 2018
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in