Authors
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदी साठी अर्जुन देवोडीया यांनी केले आहे.)
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणा येथून पंजाबपर्यंत जात आहे. दरम्यान, खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते कुठेतरी बसून खाताना दिसत आहेत. डायनिंग टेबलवर ड्रायफ्रुट्स, मांसाहारी पदार्थ आणि दारूसारखा दिसणारा पेयाचा ग्लासही ठेवलेला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे.
हा फोटो शेअर करताना यूजर्स राहुल गांधींना टोमणे मारत आहेत आणि लिहित आहेत, “तपस्वी, तपश्चर्यामध्ये लीन.” या कॅप्शनसह हा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक युजर्स हा फोटो व्हाट्सअपवरही शेयर करीत आहेत.
Fact Check/ Verification
व्हायरल फोटोच्या गुगल रिव्हर्स सर्चवर आम्हाला टाईम्स नाऊची बातमी सापडली. ही बातमी राहुल गांधींच्या आरोग्यदायी आहार आणि दिनचर्येवर आधारित आहे. पत्रकार आणि लेखक परंजॉय गुहा ठाकुरता यांचे एक ट्विटही या बातमीत आहे.
या ट्विटमध्ये व्हायरल झालेल्या फोटोप्रमाणेच एक चित्र पाहायला मिळत आहे, पण त्यात जेवणाच्या टेबलावर मांसाहारी पदार्थ आणि दारूचा ग्लास दिसत नाही. फोटोमध्ये ड्रायफ्रुट्स, काही पदार्थ आणि एक ग्लास मध्ये दुधासारखे पेय दिसत आहे.
७ जानेवारीच्या या ट्विटमध्ये परंजॉय गुहा ठाकुरता यांनी लिहिले आहे की, ते पंजाबला जात होते आणि योगायोगाने भारत जोडो यात्राही त्यांच्या मार्गावरून जात होती. यादरम्यान राहुल गांधी जेवत असताना कर्नालजवळील एका ढाब्यावर त्यांची भेट झाली. दुसर्या ट्विटमध्ये, एक फोटो शेअर करताना परांजॉयने सांगितले की, त्यांनी त्यांचे एक पुस्तकही राहुलला भेटीत दिले.
Newschecker यांनीही याबाबत परंजॉय यांच्याशी संपर्क साधला. परंजॉय यांनी आपल्या ट्विटमध्ये वापरलेला राहुल गांधींचा फोटो आपण स्वतः क्लिक केल्याचे सांगितले. मूळ फोटोशी छेडछाड केल्याचे येथे स्पष्ट होते.
Conclusion
अशाप्रकारे राहुल गांधींचा व्हायरल झालेला हा फोटो बनावट असल्याची पुष्टी आमच्या तपासात झाली आहे. एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने फोटोमध्ये एक दारूचा ग्लास आणि मांसाहारी पदार्थ वेगळे जोडले गेले आहेत.
Result: Altered Photo
Our Sources
Tweet of Journalist/Author Paranjoy Guha Thakurta
Quote of Paranjoy Guha Thakurta
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in