Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर भाववाढीला लक्ष्य करणाऱ्या पक्षाच्या ‘हल्ला बोल’ रॅलीला संबोधित करताना दरवाढीच्या मुद्द्यावरून केंद्रावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आटा (गव्हाचे पीठ) ची किंमत 2014 मध्ये 22 रुपये प्रति लिटरवरून आता 40 रुपये प्रति लिटर झाली आहे. काही सत्यापित खात्यांसह अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ प्रसारित करण्यास सुरवात केली, किलोऐवजी लिटर या शब्दाचा वापर केल्याबद्दल राहुल गांधी यांची खिल्ली उडविली गेली.
न्यूजचेकरने “राहुल गांधी हल्ला बोल रॅली” या कीवर्डचा वापर करून रॅलीचा शोध घेतला, ज्यामुळे आम्हाला 4 सप्टेंबर 2022 रोजी राहुल गांधी यांच्या खात्याने अपलोड केलेल्या रॅलीच्या या यूट्यूब लाइव्हस्ट्रीमकडे नेले. आपल्या भाषणात गांधींनी महागाईवर प्रकाश टाकणारी आकडेवारी बाहेर काढत भाजपप्रणित सरकारवर ताशेरे ओढले. २०१४ ते आतापर्यंत (१:०९:१० चा आकडा ते १:०९:५१) जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण पाहू शकतो की त्यानी अट्टाच्या किंमतींची तुलना लिटरमध्ये केली होती, परंतु ताबडतोब त्यानी जीभेची घसरण दुरुस्त करून माफी मागितली व किलो असा उल्लेख केला.
आम्ही हा व्हिडिओ न्यूज18, ANI सारख्या इव्हेंटच्या इतर लाईव्ह स्ट्रीमसह क्रॉस-चेक केला आणि आम्हालाही तेच आढळले.
यावरून न्यूजचेकरला कळाले की, महागाईविरोधातील काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी केलेल्या भाषणाचा एक क्लिप केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला जात आहे, ज्यात त्यांनी “लिटर” वरून किलो ही चूकीची केलेली दुरुस्ती वगळली आहे.
(हा लेख मूळतः न्यूजचेकर हिंदीने प्रकाशित केला होता)
Our Sources
Rahul Gandhi YouTube Video, September 4, 2022
ANI YouTube Video, September 4, 2022
News 18 YouTube Video, September 4, 2022
India Tv YouTube Video, September 4, 2022
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad Prabhu
February 8, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
Runjay Kumar
January 22, 2025