Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, अशी मशीन लावणार ज्यातून एका बाजूने बटाटा घालून दुसरीकडून सोने काढेन.
Fact
व्हायरल व्हिडीओ चुकीच्या अर्थाने पसरविण्यात येत आहे. प्रत्यक्ष भाषणात संबंधित वक्तव्य राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यातच राजकीय पक्ष एकमेकांवर सोशल मीडियावर चिखलफेक करीत आहेत. यातूनच अनेक पोस्ट जन्म घेत आहेत. सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाची एक व्हिडीओ क्लिपिंग शेयर करून केला जाणारा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. बटाट्यापासून सोने काढणारी मशीन लावणार असे विधान राहुल गांधींनी केल्याचे हा दावा सांगतो.
आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर मिळाला.
“अशी मशीन लावणार, याबाजूने बटाटा घुसेल आणि त्याबाजूने सोने बाहेर येईल.” असे राहुल गांधी यामध्ये बोलताना आढळतात.
आम्हाला हा दावा फेसबुकवरही आढळला. विशेषतः दाव्याच्या व्हिडिओमध्ये “उद्या ही मशीन मिळणार सोलापूरकरांना” असे लिहील्याचेही आमच्या पाहणीत आले.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
व्हायरल दाव्याच्या तपासासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या काही किफ्रेम्स काढल्या आणि त्यावर Google वर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला १३ नोव्हेंबर २०१७ रोजी राहुल गांधी यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर अपलोड केलेला एक व्हिडीओ मिळाला.
व्हीडीओचे संग्रहण येथे पाहता येईल.
“पीएम मोदी के फैसलों से जूझ रहा है गुजरात | राहुल गाँधी” अशा शीर्षकाखाली हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. डिस्क्रिप्शन मध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात येथील पाटण येथे बोलत असताना अशी माहिती वाचायला मिळाली. आम्ही हा व्हिडीओ बारकाईने पाहिला असता, यावरून आमच्या हे निदर्शनास आले की, राहुल गांधी हे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत होते. राहुल गांधी व्हिडिओमध्ये १७.५० मिनिटावर “भाजप सरकारने टाटाच्या नॅनो कंपनीला मोठी आर्थिक मदत देऊन कंपनी उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मिळवल्या, पण याचा फायदा गुजरातच्या जनतेला झालाच नाही.” असे सांगताना ऐकायला मिळतात.
“गुजरातमधील आदिवासी आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या लोकांना करोडो रूपये देण्याचे वचन देऊन त्यांना एकही रूपया दिला नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटाटा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना वचन दिले होते की, ते अशी मशीन बसवतील की, तीत एका बाजूने बटाटे टाकले की, दुसऱ्या बाजूने सोने बाहेर पडेल. हे माझे शब्द नसून नरेंद्र मोदींचे आहेत.” असेही बोलताना पाहता आणि ऐकता येते.
यावरून आमच्या तपासात स्पष्ट होते की, राहुल गांधी यांच्या भाषणातील अर्धा भाग कापून क्लिपिंगच्या माध्यमातून चुकीचा दावा करण्यात आला आहे.
अशाप्रकारे आमच्या तपासात स्पष्ट होते की, काँग्रेस नेते राहुल गांधी अशी मशीन लावणार ज्यातून एका बाजूने बटाटा घालून दुसरीकडून सोने काढेन, असे म्हणाल्याचे सांगणारा व्हायरल व्हिडीओ चुकीच्या अर्थाने पसरविण्यात येत आहे. प्रत्यक्ष भाषणात संबंधित वक्तव्य राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे म्हटले आहे.
Our Sources
Self Analysis
Google Search Results
Video published by Rahul Gandhi on November 13, 2017
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
May 19, 2024
Prasad S Prabhu
April 17, 2025
Prasad S Prabhu
April 16, 2025