Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होत आहे. यात शेतकरी नेते राकेश टिकेत आणि त्यांच्या साथीदारांच्या चेह-याला काळे फासण्यात आल्याचे दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की, भारत बंद करण्याचे प्रयत्न करणारे शेतकरी नेते राकेश टिकेत आणि त्यांच्या साथीदारांना राजस्थानमधील पपलाज येथे जनतेने बेदम मारहाण केली आणि चेह-याला काळे देखील फासले.
शेतकरी नेते राकेश टिकेत केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात देशभर दौरा करुन जागृती करत आहेत. अशातच सोशल मीडियात हा फोटो व्हायरल होत आहे. यात राकेश टिकेत यांच्यासह इतर लोकांच्या चेह-यांवर देखील काळे फासल्याचे दिसून येत आहे. संयुक्त किसान मोर्चाने 26 मार्च रोजी भारत बंदची घोषणा केली होती. तसेच राकेश टिकेत 27 मार्च रोजी राजस्थानमधील पपलाज येथे झालेल्या शेतकरी सभेस उपस्थित राहिले होते. यानंतर हा फोटो व्हायरल झाला आहे.
राजस्थान मधील पपलाज येथे शेेतकरी नेते राकेश टिकेत याना खरंच मारहाण झाली आणि त्यांना काळे फासण्यात आले आहे का याचा शोध घेतला असता आम्हाला 27 मार्च रोजी त्यांना मारहाण झाल्याची किंवा त्यांच्या चेह-याला काळे फासण्यात आल्याची बातमी आढळून आली नाही.
मात्र राकेश टिकेत यांच्या ताफ्यावर अलवर येथे हल्ला झाल्याची तसेच त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला गेल्याची 2 एप्रिलची न्यूज 18 ची बातमी आढळून आली. मात्र या बातमीत कुठेही त्यांना काळे फासल्याची किंवा मारहाण झाल्याचा उल्लेख नाही. बातमीत म्हटले आहे की, राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राजस्थान पोलिसांनी शेतकरी नेते राकेश टिकेत यांना काळे झेंडे दाखवल्याबद्दल आणि त्यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली 14 तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी कलम 307, 398,332,53,145,46,47,48, 49,323,41,506 आणि 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तातारपूर पोलिसांनी अटक केलला मुख्य आरोपी कुलदीप यादव मत्स्य विद्यापीठाचे माजी छत्रसंघ अध्यक्ष असल्याचे समजते.
सोशल मीडियात व्हायरल होत असलेला राकेश टिकेत यांचा फोटो या बातमीत आढळून आला नाही. यावरुन आम्ही व्हायरल फोटो नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे याचा शोध घेण्यासाठी Google Reverse Image चा शोध घेतला. असता आम्हाला 19 जानेवारी रोजीचा दिल्लीच्या सिंघु बाॅर्डरवरील शेतकरी आंदोलना दरम्याचा व्हिडिओ News 24 या यूट्यूब चॅनलवर आढळून आला. यात राकेश टिकेत आणि त्यांचे सहकारी व्हायरल फोटोतील पोज प्रमाणे उभे आहेत त्यांच्या अंगावर तसेच कपडे आहेत असे दिसून येते. राकेश टिकेत यात ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना म्हणतात की, रॅली साठी आम्हाला दिल्ली पोलिसांच्या परवानगीची गरज नाही.
आम्ही व्हायरल फोटो आणि व्हिडिओतील स्क्रिनशाॅटची तुलना केली असता आम्हाला व्हिडिओतील स्क्रीनशाॅट काढून तो एडिट करण्यात आल्याचे आढळून आले. आपण खाली दोन्हींची तुलना पाहू शकता.
आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, राकेश टिकेत यांना राजस्थान मध्ये काळे फासण्यात आलेले नाही किंवा मारहाण झालेली नाही. सिंघु बाॅर्डरवरील आंदोलना दरम्यानचा फोटो एडिट करुन चुकीच्या दाव्याने व्हायरल करण्यात आला आहे.
Read More : तिरुपती बालाजी मंदिर आणि सिद्धिविनायक ट्रस्टसंदर्भात व्हायरल झाला चुकीचा दावा
News 24– https://www.youtube.com/watch?v=E7b7xEBt1co
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad Prabhu
October 22, 2024
Runjay Kumar
August 6, 2024
Komal Singh
July 29, 2024