Friday, December 27, 2024
Friday, December 27, 2024

HomeFact Checkरणबीर कपूरने फॅनचा फोन फेकला? व्हायरल व्हिडिओचे सत्य येथे जाणून घ्या

रणबीर कपूरने फॅनचा फोन फेकला? व्हायरल व्हिडिओचे सत्य येथे जाणून घ्या

(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी साठी सर्वप्रथम सौरभ पांडे यांनी केले आहे.)

रणबीर कपूरने सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा फोन फेकून दिल्याचा दावा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून केला जात आहे.

सोशल मीडिया यूजर्सचा एक भाग बॉलीवूड कलाकारांना सतत घेरतोय. युजर्स बॉलीवूड सेलिब्रिटींवर सांस्कृतिक अधोगतीचा आणि नवीन कलाकारांना समान संधी न देण्याचा आरोप करतात. रणबीर कपूरचे पणजोबा पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरू झालेली अभिनय कारकीर्द पिढ्यानपिढ्या कपूर कुटुंबात वाढत गेली. त्याच्या समृद्ध पार्श्वभूमीमुळे, सोशल मीडिया वापरकर्ते रणबीर कपूरवर घराणेशाहीचा लाभार्थी असल्याचा आरोप देखील करतात.

या संदर्भाने, सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ शेअर करत आहेत ज्यात दावा केला जात आहे की रणबीर कपूरने सेल्फी घेणाऱ्या एका चाहत्याचा फोन फेकून दिला आहे.

Fact Check/ Verification

रणबीर कपूर सेल्फी घेत असलेल्या चाहत्याचा फोन फेकून देत असल्याच्या व्हिडिओची चौकशी करत असताना, आम्हाला 28 जानेवारी 2023 रोजी Ranbir Kapoor Universe या ट्विटर हँडलने शेअर केलेले ट्विट आढळले, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओ ला OPPO Reno फोन ची जाहिरात असल्याचे सांगण्यात आले आहे.

शोधताना, आम्हाला OPPO India च्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे 28 आणि 29 जानेवारी 2023 रोजी पोस्ट केलेले दोन ट्विट आढळले, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओचे वर्णन OPPO RENO 8T नावाच्या फोनची जाहिरात म्हणून केले गेले आहे.

त्याचप्रमाणे, आम्हाला OPPO इंडियाच्या YouTube चॅनेल आणि Instagram पेजवर व्हायरल व्हिडिओ पब्लिश केलेला आढळला.

OPPO इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर दम्यंत सिंह खानोरिया यांनी देखील कंपनीच्या नवीन उत्पादन OPPO RENO 8T चा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर, फोन फेकल्यानंतर रणबीरने मुलाला नवीन ओप्पो फोन दिला आणि त्याच्यासोबत हसत सेल्फीही घेतल्याचे दिसून येते.

Conclusion

अशा प्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की रणबीर कपूरसोबत सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा फोन फेकल्याच्या नावावर केला जात असलेला दावा दिशाभूल करणारा आहे. प्रत्यक्षात व्हायरल झालेला व्हिडिओ OPPO इंडियाच्या नवीन उत्पादन OPPO RENO 8T च्या जाहिरातीचा आहे.

Result: Partly False

Our Sources

Tweets shared by OPPO India on 28 and 29 January, 2023

Instagram video shared by OPPO India on 28 January, 2023

YouTube video published by OPPO India on 28 January, 2023

Tweet shared by OPPO India CMO Damyant Singh Khanoria on 29 January, 2023

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular