Authors
Claim
स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाले नाही.
Fact
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाच्या सुरुवातीच्या क्षणांमध्ये ध्वज पूर्णपणे फडकला नव्हता. मात्र, काही मिनिटांतच ध्वज पूर्णपणे फडकवण्यात आला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाले नसल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या प्रसंगांनंतर ध्वजारोहणातील त्रुटींशी संबंधित अनेक दावे व्हायरल होतात. अनेक वेळा मानवी चुकांमुळे ध्वज उलटा फडकावण्यासंबंधीचे, ध्वजारोहण करताना ध्वज फडकावण्याऐवजी खाली येतो किंवा ध्वज पूर्णपणे फडकत नाही असे सर्व दावे सोशल मीडिया युजर्स त्यांच्या संबंधित वैचारिकतेनुसार आणि राजकीय बांधिलकी अनुसार शेअर करत राहतात. या क्रमाने, सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ शेअर करत आहेत, ज्यात दावा केला जात आहे की स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाले नाही.
Fact Check/ Verification
स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण न झाल्याच्या नावाखाली शेअर करण्यात आलेला हा दावा तपासण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक YouTube चॅनेलकडे वळलो. या प्रक्रियेत, आम्हाला 15 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान मोदींच्या चॅनलने प्रकाशित केलेला व्हिडिओ सापडला, ज्यामध्ये लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याशी संबंधित दृश्य आहे.
व्हिडिओमध्ये 55 सेकंदांनंतर पंतप्रधान ध्वजारोहणाची सुरुवात करताना दिसत आहेत. मात्र, यादरम्यान ध्वज पूर्णपणे फडकत नाही आणि पंतप्रधानांनी ध्वजाची दोरी ओढताच राष्ट्रगीत सुरू होते त्यामुळे सलामी देताना सावधान स्थितीत उभे राहून ते राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात करतात.
व्हिडिओ पाहिल्यावर, आम्हाला आढळले की 2 मिनिटे 25 सेकंद आणि 2 मिनिटे 28 सेकंदांच्या दरम्यान ध्वज पूर्णपणे फडकलेला दिसतो.
यानंतर, व्हायरल व्हिडिओबद्दल अधिक माहितीसाठी आम्ही editorji चे ट्विटर खाते शोधले. या प्रक्रियेत आम्हाला कळले की राष्ट्रगीत संपल्यानंतर पंतप्रधानांच्या जवळ उभी असलेली महिला जवान दोरी ओढून ध्वज पूर्णपणे फडकवते. विशेष म्हणजे व्हिडिओच्या शेवटी ध्वज पूर्णपणे फडकवल्यानंतर फुलेही खाली पडताना दिसत आहेत.
Conclusion
त्यामुळे स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण न झाल्याच्या नावाखाली केला जात असलेला हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात ध्वजारोहणासाठी पंतप्रधानांनी त्याला बांधलेली दोरी ओढली तेव्हा ध्वज पूर्णपणे फडकला गेला नाही आणि राष्ट्रगीत सुरू झाले. यानंतर पंतप्रधानांनी सलामीच्या मुद्रेत राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. मात्र, राष्ट्रगीत संपल्यानंतर पंतप्रधानांच्या जवळ उभ्या असलेल्या महिला जवानाने दोरी ओढून पूर्णपणे ध्वज फडकवला.
Result: Missing Context
Our Sources
YouTube video published by PM Narendra Modi’s channel on 15 August, 2023
Tweet shared by editorji on 15 August, 2023
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी सौरभ पाण्डे यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in