Authors
(याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख शुभम सिंह याने लिहिला आहे)
सोशल मीडियावर धार्मिक विवादाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक व्यक्ती हातात चाकू घेऊन एका मुलीला धमकवतांना दिसत आहे. हा व्हिडिओ युजर ‘लव्ह जिहाद’च्या नावाने शेअर करत आहे.
काही ट्विटर युजर हा व्हिडिओ शेअर करत ही घटना ‘लव्ह जिहाद’चा असल्याचा दावा करत आहे.
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.
काही फेसबुक युजर देखील हा व्हिडिओ ‘लव्ह जिहाद’चा असल्याचा दावा करत आहे.
देशात विविध ठिकाणाहून ‘लव्ह जिहाद’च्या बऱ्याच घटना समोर येत असतात. एबीपी न्यूजच्या एका बातमीनुसार, नुकतेच गाझियाबादच्या इंदिरापुरम पोलीस स्थानक परिसरातून एक घटना समोर आली आहे. आठ वर्षांपासून एका मुस्लिम व्यक्तीने हिंदू नाव ठेवून एका शीख महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. याचे सत्य बाहेर आल्यावर महिलेने तक्रार दाखल केली.
Fact Check / Verification
व्हायरल दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी व्हायरल व्हिडिओ पुन्हा पाहिला. व्हिडिओत एक फलक दिसत आहे. त्यावर ‘VM02 Cafe’ लिहिलं आहे. त्या दुकानाच्या फलकावर फोन नंबर देखील लिहिला आहे. आम्ही त्या नंबरवर फोन केला. VM02 Cafe च्या संचालिका योगिता यांनी आम्हांला सांगितले की,”हा व्हिडिओ इंदौरच्या जगजीवन रामनगरमधील असून हा तीन-चार दिवसांपूर्वीचा आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या एका मुलीच्या मित्राने हा व्हिडिओ बनवला आहे. हातात चाकू दिसणाऱ्या मुलाचे नाव शानू आहे. याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या मुलाला अटक केली. या घटनेला ‘लव्ह जिहाद’ सारखी धार्मिक बाजू नाही.”
त्यानंतर आम्ही ‘इंदौर जगजीवन चाकू युवती’ हा कीवर्ड टाकून गुगलवर शोधले. तेव्हा आम्हांला २७ जुलै २०२२ रोजी प्रकाशित झालेली न्यूज १८ ची बातमी मिळाली. त्या बातमीनुसार, पीयूष उर्फ शानू नावाचा व्यक्तीला एका मुलीशी लग्न करायचे होते आणि लग्न करण्यासाठीच तो दबाव टाकत होता. पण त्या मुलीने नकार दिला. त्यानंतर त्या मुलाने चाकू घेऊन मुलीला धमकवण्याचा प्रयत्न केला.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी त्या मुलाला अटक केली. त्या व्यक्तीने आपला गुन्हा कबूल केला. त्या मुलीने कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. पण पोलिसांनी स्वतः घटनेची दखल घेत गुन्हा दाखल केला.
याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी न्यूजचेकरने इंदौरच्या एमआयजी ठाण्याशी संपर्क साधला. तेथील हेड कॉन्स्टेबल गोपाल यांनी आम्हांला सांगितले,”सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचा ‘लव्ह जिहाद’शी संबंध नाही. ही प्रेम प्रकरणाची घटना आहे. व्हिडिओत चाकू हातात असणाऱ्या व्यक्तीचे नाव पीयूष सिंह रावत आहे आणि त्याचे वय २७ वर्ष आहे. आम्ही त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याच्याविरुद्ध आधी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केले होते. आता तो व्यक्ती एका अन्य प्रकरणात तुरुंगात आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेने तक्रार दाखल केली नव्हती.”
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, एक व्यक्ती चाकूने एका मुलीला धमकवण्याचा तो व्हायरल व्हिडिओ भ्रामक दाव्यासोबत शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ इंदौरचा आहे आणि या घटनेचा ‘लव्ह जिहाद’ आणि अन्य धार्मिक विवादाशी संबंध नाही. व्हिडिओत दिसणारे सर्व लोक एकाच समुदायाचे आहे.
Result : Partly False
Our Sources
२७ जुलै २०२२ रोजी प्रकाशित झालेली न्यूज १८ ची बातमी
फोनवरून VM02 Cafe च्या संचालिका योगिता यांच्याशी झालेला संवाद
फोनवरून इंदौरच्या एमआयजी पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल गोपाल यांच्याशी झालेला संवाद
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.