Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
केंद्रीय कर्मचाऱ्यांची निवृत्ती वयोमर्यादा ६० वरून ६२ वर्षे करण्यात आली आहे.
Fact
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयोमर्यादेत कोणतीही वाढ झालेली नाही.
भारत सरकारच्या आदेशानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा ६० वरून ६२ वर्षे करण्यात आल्याचा दावा करणारे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, तपासाअंती आम्हाला आढळून आले की हा दावा खोटा आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयोमर्यादेत कोणतीही वाढ झालेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पत्रात लिहिले आहे की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय २ वर्षांनी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. १ एप्रिल २०२५ पासून हा निर्णय लागू होणार असल्याचे पत्रात लिहिले आहे. X पोस्ट (आर्काइव) मध्ये पत्र शेयर करत लिहिले आहे की, “केन्द्र सरकार ने अपने कर्मचारियों की सेवानिवृत्ति आयु में की 2 साल की बढ़ोतरी, केन्द्रीय कर्मचारी अब होंगे 62 साल में सेवानिवृत्त 1 अप्रैल 2025 से लागू।”
अशा इतर पोस्ट येथे आणि येथे पहा.

दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही संबंधित कीवर्डसाठी Google वर शोधले. या कालावधीत, आम्हाला कोणताही विश्वासार्ह रिपोर्ट सापडला नाही जो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे करण्यात आल्याच्या दाव्याला पुष्टी देईल. माहिती कार्यालयाकडूनही असे कोणतेही प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेले नाही.
तपासादरम्यान, आम्हाला आढळले की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयातील बदलाबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ९ ऑगस्ट २०२३ रोजी लोकसभेत देण्यात आले होते. या उत्तरात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय बदलण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याची पुष्टी करण्यात आली.

तपासादरम्यान, आम्हाला आढळले की ‘PIB फॅक्ट चेक‘, या भारत सरकारच्या अधिकृत फॅक्ट चेक युनिटने, १९ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांच्या अधिकृत X हँडलद्वारे व्हायरल झालेल्या पत्रातील निवृत्तीचे वय वाढवल्याचा दावा खोटा ठरवला आहे. हा दावा फेटाळून लावत त्यांनी ही बातमी खोटी असून भारत सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही असे स्पष्ट केले आहे.

तपासादरम्यान, आम्हाला आढळले की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयोमर्यादेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
Sources
X post by PIB Fact Check on 19th November 2024.
Loksabha Answer given on 9th August 2024.
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी कोमल सिंग त्यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025
Kushel Madhusoodan
November 26, 2025