Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
कर्नाटकातील बेळगावमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घराची आरएसएस सदस्यांनी तोडफोड केल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.
संबंधित पोस्ट येथे पाहता येईल.
व्हायरल फोटोवर गुगल लेन्स सर्च केल्यावर आम्हाला @TheSouthfirst द्वारे २६ एप्रिल २०२४ रोजी केलेली आणि व्हायरल फोटोचा समावेश असलेली एक X पोस्ट मिळाली. ज्यामध्ये असे म्हटले होते की, “हताश मतदारांनी केवळ ईव्हीएमचे नुकसान केले नाही तर हनूर तालुक्यात त्यांना आगही लावल्याने एमएम हिल्स ग्रामपंचायत हद्दीत तणाव निर्माण झाला.”
२६ एप्रिल २०२४ रोजी डेक्कन हेराल्डने प्रकाशित केलेल्या एका वृत्तात असे म्हटले आहे की, “चामराजनगर जिल्ह्यातील हनुर तालुक्यातील इंदिगनाथा गावातील रहिवाशांनी महादेश्वरा ग्रामपंचायत हद्दीतील मतदान केंद्रावर मतदानावर बहिष्कार टाकला, दगडफेक करून विरोध दर्शविला आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे नुकसान केले, त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली…”
त्या फोटोला कॅप्शन देण्यात आले होते, “चामराजनगर जिल्ह्यातील हनूर तालुक्यात दगडफेकीच्या घटनेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि फर्निचरचे नुकसान झाले.”
१४ मे २०२५ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत, बेळगावचे एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी या घटनेचा इन्कार केला आणि ही “खोटी बातमी” असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की गोकाकचे सीपीआय सुरेश आरबी यांनी कोन्नूर गावात कर्नल कुरेशी यांच्या सासऱ्यांच्या घरी भेट दिली. त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे आणि अनावश्यकपणे जनतेला भेटू नये असे सांगण्यात आले आहे.
दुसऱ्या एका एक्स युजरने दावा केला की बजरंग दलाच्या सदस्यांनी विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या घराची तोडफोड केली. तथापि, न्यूजचेकरला असे आढळून आले की असा आरोप करण्यासाठी वापरलेला फोटो प्रत्यक्षात यूकेच्या नेवार्कमधील एका जुन्या घटनेशी संबंधित आहे.
त्यामुळे, कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घरावर आरएसएस सदस्यांनी हल्ला केल्याचा आरोप करणाऱ्या व्हायरल पोस्ट खोट्या असल्याचे स्पष्ट झाले.
Sources
X Post By @TheSouthfirst, Dated April 26, 2024
Report By Deccan Herald , Dated April 26, 2024
X Post By @ZeeKannadaNews, Dated May 14, 2025
Report By Newark Advertiser, Dated February 22, 2018
(With inputs from Ishwarachandra B G of Newschecker Kannada.)
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी वसुधा बेरी यांनी केले असून येथे वाचता येईल)
Runjay Kumar
June 5, 2025
Prasad S Prabhu
June 4, 2025
Komal Singh
June 4, 2025