खासदार साध्वी प्रज्ञासिंग यांना कोरोना झाल्यामुळे मुंबईतील कोकिळाबेन अंबानी हाॅस्पिटलमध्ये दाखल केले असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी साध्वींनी मी गोमुत्र पीत असल्यानेच मला कोरोना झाला नाही असे वक्तव्य केले होते, या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका देखील झाली होती. असातच आता त्यांना कोरोनामुळे हाॅस्पिटलमध्ये दाखल केले गेल्याचा दावा सोशल मीडियात शेअर होत आहे.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, “गोमूत्राने कोरोनाचा इलाज करण्याचे प्रवचन देणा-या भाजपाच्या खासदार आणि ब्राह्मण नेत्या साध्वी प्रज्ञा ठाकूर कोरोना पाॅझिटिव्ह झाल्यानंतर एअर अॅम्बुलेंसने मुंबईतील कोकिळाबेन हाॅस्पिटध्ये बरती झाल्या. बीजेपीचे हे ढोंगी नेते देशातील लोकांना भ्रमित करुन मृत्यूच्या दारात लोटतातआणि स्वत:सरकारी खर्चाने व्हिआयपी उपचार करुन घेतात. बीजेपीच्या अशा ढोंगी लोकांनी हाॅसपिटलमध्ये जाऊ नये. गायीच्या मुत्रानेच इलाज करुन घ्यावा.”
संग्रहित
Fact Check/Verification
व्हायरल चित्राचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेजद्वारे फोटो शोधला. यावेळी, आम्हाला अमर उजाला च्या वेबसाईटवर व्हायरल फोटो असेलली एक बातमी 18 मे 2016 रोजी प्रकाशित झाल्याचे आढळून आले. या बातमीनुसार साध्वी प्रज्ञा यांना कॅंसर झाला असून त्यांची सिंहस्थ कुंभ सुरु असल्याने क्षिप्रा नदीत डुबकी लावण्याची शेवटची इच्छा आहे. परंतु त्यांच्यावर सुरू असलेल्या खटल्यामुळे त्यांना तसे करण्यास परवानगी दिली जात नाही. ज्यासाठी त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना पत्र लिहिले आहे. मात्र या बातमीत व्हायरल फोटो नेमका कधीचा आहे याची माहिती दिलेली नाही.

प्राप्त माहितीच्या आधारे काही कीवर्डद्वारे गुगलवर शोध घेतला. या वेळी The Hindu च्या वेबसाईटवर व्हायरल फोटो विषयी बातमी आढळून आली. ही बातमी 10 जानेवारी 2013 रोजी प्रकाशित झाली आहे. यात म्हटले आहे की, साध्वी प्रज्ञा यांचा हा फोटो 9 जानेवारी 2013 रोजीचा आहे. त्यांना स्तनांचा कॅन्सर असल्याने व त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना भोपाळच्या जवाहरलाल नेहरू कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

आम्ही साध्वी प्रज्ञाच्या आरोग्यासंदर्भात अनेक कीवर्ड्सद्वारे गुगलचा शोध घेतला.साध्वी प्रज्ञाची तब्येत ढासळली आहे किंवा त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले होते का याचा शोध घेतला असता आम्हाला एमपी तक या युट्यूब चॅनलवर साध्वी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईतील कोकिळाबेन हाॅस्पिटलमध्ये एअर अॅम्बुलेंस ने भरती करण्यात आल्याची बातमी आढळून आली. मात्र ही बातमी दोन महि्यापूर्वीची आहे व यात त्यांना कोरोना झाल्याचा उल्लेख नाही.
गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचा संसर्ग दूर होतो. मी स्वत: गोमूत्रं घेते, त्यामुळेच मला कधी कोणतं औषध घ्यावं लागलं नाही. मला कोरोनाही झाला नाही, असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 17 मे 2021 रोजी म्हटलं होतं. त्यानंत त्या आजारी असल्याची एकही बातमी माध्यमांत किंवा समाज माध्यमात ालेली नाही. त्यामुळे व्हायरल दावा चुकीचा आहे.
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविषयी चुकीचा दावा व्हायरल झाला आहे. त्यांना कोरोना झाला नसून त्यांचा व्हायरल फोटो हा 2013 मधील आहे.
Read More : रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटलेले नाही
Result: False
Claim Review: साध्वी प्रज्ञासिंग यांना कोरोनामुळे हाॅस्पिटलमध्ये दाखल केले Claimed By: Viral Post Fact Check: False |
Our Sources
अमर उजाला-https://www.amarujala.com/india-news/police-to-take-sadhvi-pragya-for-simhasth-kumbh?pageId=1
एमपी तक – https://www.youtube.com/watch?v=fWMc940aNAc
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.