Thursday, March 20, 2025
मराठी

Fact Check

ती ‘कबर’ औरंगजेबाच्या शौर्याचे प्रतीक असे संजय राऊत म्हणाले? येथे जाणून घ्या सत्य

Written By Prasad S Prabhu, Edited By JP Tripathi
Mar 19, 2025
banner_image

Claim

image

ती 'कबर' औरंगजेबाच्या शौर्याचे प्रतीक असे संजय राऊत म्हणाले.

Fact

image

औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे, अशा खासदार संजय राऊत यांच्या विधानाला चुकीचा संदर्भ देऊन व्हायरल करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हा मुद्दा गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भात दावा केला जात आहे की, ती ‘कबर’ औरंगजेबाच्या शौर्याचे प्रतीक असे संजय राऊत म्हणाले.

एका युजरने “नरपिशाच औरंगजेब के कब्र को शौर्य का प्रतीक बता रहा है उद्धव ठाकरे के लाडले मियां संजय राऊत! आज हिंदू हृदय सम्राट बालासाहब ठाकरे जी की आत्मा क्या कह रही होगी?” अशा हिंदी कॅप्शनसह हा दावा केला आहे.

ती 'कबर' औरंगजेबाच्या शौर्याचे प्रतीक असे संजय राऊत म्हणाले? येथे जाणून घ्या सत्य

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.

आणखी एका युजरने “सनातनी भाई बहनों जय श्री सियाराम, औरंगजेब की क़ब्र शौर्य का प्रतीक है, संजय राउत (शिव सेना,उद्धव), जिसने ना सुना हो वो सुन लीजिये, शक विश्वास में बदल जायेगा कि ये साला १००% मुग़ल बीज ही है…” अशा कॅप्शनखाली हा दावा केला आहे.

ती 'कबर' औरंगजेबाच्या शौर्याचे प्रतीक असे संजय राऊत म्हणाले? येथे जाणून घ्या सत्य

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही दाव्यासोबत शेयर केला जात असलेला व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला. यामध्ये खासदार संजय राऊत हिंदीमध्ये संभाषण करताना आढळतात. एका पत्रकार परिषदेत पत्रकाराच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी, “…..नहीं लोगों की कोई भूमिका नहीं है और एकनाथ शिंदे की भी कोई भूमिका नहीं है । ये अमित शाह की भूमिका है…एकनाथ शिंदे जी की क्या भूमिका हो सकती है उसमें? कल तक तो तीन साल तक हमारे साथ रहे उनको मालूम है क्या भूमिका है?” असे बोलताना ऐकू येते.

यापुढे बोलताना संजय राऊत म्हणतात की, “… शौर्य का प्रतीक है…शौर्य का प्रतीक कभी टूटना नहीं चाहिए। ये हमारी भूमिका है। छत्रपति शिवाजी महाराज ने औरंगजेब से इतना बड़ा युद्ध किया है…मराठाओं ने…छत्रपति जी की मृत्यु के बाद भी पचीस साल औरंगजेब महाराष्ट्र में लड़ता रहा, लेकिन विजय नहीं प्राप्त कर सके और वहां उनकी कब्र। ये आने वाली पीढ़ियों को इतिहास दिखना चाहिए । चाहे अफजल खान की कब्र हो या चाहे औरंगजेब की कब्र  हो ….अगर इतिहास को समझने को तैयार नहीं तो इतिहास के शत्रु हैं…दुश्मन हैं इतिहास के।”

यावरून संबंधित कबरीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी त्या कबरीला औरंजेबाच्या शौर्याचे प्रतीक म्हटल्याचे कुठेही स्पष्ट झाले नाही. उलट त्यांनी येणाऱ्या पिढ्यांना इतिहास दाखवला पाहिजे असे विधान केल्याचे आम्हाला दिसून आले.

अधिक तपासासाठी आम्ही संजय राऊत यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या विधानासंदर्भात Google वर शोधले. दरम्यान आम्हाला अनेक मीडिया रिपोर्ट मिळाले. सर्वप्रथम आम्हाला News18 Lokmat ने १७ मार्च २०२५ रोजी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेचा अपलोड केलेला व्हिडीओ मिळाला.

“औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण पेटलं, राऊतांचा सरकारला सवाल” अशा शीर्षकाखालील या व्हिडीओ रिपोर्टमध्ये पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मांडलेले सर्व मुद्दे मांडण्यात आलेले आहेत . यामध्ये आम्हाला “ती कबर मराठा शौर्याचे प्रतीक आहे आणि भावी पिढ्यांनी ते जाणून घेतले पाहिजे. संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे शूर योद्धा होते आणि त्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी लढा दिला. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आहे, पण हे स्मारक मराठ्यांच्या शौर्याबद्दल सांगते. मराठ्यांनी मुघलांविरुद्ध कसा लढा दिला हे पुढील पिढीला माहीत असले पाहिजे. ते मराठ्यांवर विजय मिळवू शकले नाहीत आणि शेवटी कबर बांधली गेली. आता, ज्यांना इतिहासाचे ज्ञान नाही, ते कबर हटवण्यास सांगत आहेत.” असे बोलताना आढळले.

“महागाई आणि आत्महत्या करत असलेल्या शेतकऱ्यांवर आंदोलन व्हायला हवे. जेव्हा सरकार आरएसएस चालवत आहे, तर आंदोलनाची गरज काय आहे? एक अधिसूचना जारी करा आणि कबर हटवा. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कबर हटवण्यापासून कोणी थांबवले आहे? त्यांनी आंदोलनाचे हे नाटक थांबवावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाने 25 वर्षे लढा दिला, पण तो मराठ्यांना हरवू शकला नाही,” असे सुरुवातीला बोलताना ते आढळतात.

आणखी तपासात आम्हाला यासंदर्भातील अनेक बातम्या सापडल्या. ANI, ABP माझा, asianet news, News 24, CNBC Awaz आदी माध्यमांच्या बातम्यातही संजय राऊत यांनी ती औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे, असेच वारंवार बोलताना ऐकू येते.

आम्ही यासंदर्भात खासदार संजय राऊत यांच्या कार्यालयाशीही संपर्क साधला, “संजय राऊत जे काही बोलले आहेत ते समोर आहे. उगाचच त्याचा विपर्यास लावून खोटे आणि बदनामीकारक दावे केले जात आहेत.” अशी माहिती त्याठिकाणी आम्हाला देण्यात आली.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे, अशा खासदार संजय राऊत यांच्या विधानाला चुकीचा संदर्भ देऊन व्हायरल करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Our Sources
News published by News 18 Lokmat on March 17, 2018
News published by ABP Majha on March 17, 2018
News published by Asianet News on March 17, 2018
News published by ANI on March 17, 2018
News published by News 24 on March 17, 2018
News published by CNBC Awaaz on March 17, 2018
Conversation with MP Sanjay Raut’s Mumbai Office

RESULT
imageMissing Context
image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,500

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.