Sunday, December 29, 2024
Sunday, December 29, 2024

HomeFact CheckScience and Technology'ऊधु पवई' हे औषधी झाड खरंच तामिळनाडूतील आहे? याचे सत्य जाणून घ्या

‘ऊधु पवई’ हे औषधी झाड खरंच तामिळनाडूतील आहे? याचे सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, तामिळनाडूत पावसाळ्यात ‘ऊधु पवई’ हे औषधी झाड आहे. याची फुले त्यातील परागकण हे रेल्वेच्या वाफेच्या इंजिनाप्रमाणे हवेत सोडतात.

फेसबुकवर ही पोस्ट व्हायरल होत आहे. “तमिळनाडु मधे पावसाळ्यात उगवणाऱ्या ‘ऊधु पवई’ या औषधी झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे, याची फुले त्यातील परागकण हे रेल्वेच्या वाफेच्या इंजिना प्रमाणे हवेत सोडतात.” असं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

फोटो साभार : Facebook/Raman Bohara
फोटो साभार : Facebook/Mohan Kawade
फोटो साभार : Facebook/Manoj Prakash Lagade

न्यूजचेकरला (+९१-९९९९४९९०४४) या व्हाट्स अॅप नंबरवर हाच दावा एका युजरने तथ्य पडताळणीसाठी पाठवला होता. याची तथ्य पडताळणी आधी तमिळने केली आहे. तुम्ही ते इथे वाचू शकता.

Fact Check / Verification

‘ऊधु पवई’ हे औषधी झाड खरंच तामिळनाडूतील आहे, याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही oodhu paavai असं गुगलवर टाकून शोधलं. तेव्हा आम्हांला समजले की, हे औषधी झाड खरे नाही. त्यानंतर आम्हांला १६ सप्टेंबर २०२१ रोजी Luke Penry नावाच्या एका युजरची इन्स्टाग्राम पोस्ट मिळाली. ही व्हिडिओ Luke Penry यांनी बनवली असून ती लंडनमधील आहे.

Instagram will load in the frontend.

Luke Penry यांनी हे ३ डी अॅनिमेशन बनवले आहे. त्यांनी हे कल्पनारम्य डिझाईन तयार केले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांचे नाव वॉटरमार्क दिसत आहे. Luke यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर बनावट बातम्या शेअर करण्याऱ्या युजरच्या पोस्ट टाकल्या आहे.

Luke यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर अशा विविध कल्पनारम्य वनस्पती बनवून त्या टाकल्या आहेत. तुम्ही त्या इथे पाहू शकता.

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, ‘ऊधु पवई’ हे औषधी झाड तामिळनाडूतील नाही. Luke Penry यांनी कल्पनारम्य ३ डी डिझाईनच्या मदतीने तयार केले आहे. मुळात अशा नावाचे कोणतेच झाड अस्तित्वात नाही.

Result : Fabricated Content/False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular