Thursday, April 24, 2025

Fact Check

शाहरुख खानचा व्हायरल फोटो मन्नत वर एनसीबीचा छापा पडल्यानंतरचा आहे का?

Written By Yash Kshirsagar
Oct 26, 2021
banner_image

सोशल मीडियावर शाहरुख खानचा विना मेकअपचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत शाहरुखची पांढरी दाढी तसेच लाल झालेला चेहरा दिसत आहे. दावा केला जात आहे की, हा फोटो त्याच्या मन्नत बंगल्यावर एनसीबीने छापा टाकल्यानंतरचा आहे.

Fact Check/Verification

शाहरुखचा मुलगा आर्यन खानला कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केल्यानंतर शाहरुख खनाच्या बंगल्यावर छापा मारला का आणि यावेळी शाहरुख खान अगतिक झाल्याचा फोटो व्हायरल झाला होता का याचा आम्ही गुगल किवर्डच्या साहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला.

या शोधादरम्यान आम्हाला ईटीव्ही भारतची 21 आॅक्टोबर 2021 रोजीची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की. क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. आज एनसीबीची टीम शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर दाखल झाली होती. चौकशीसाठी ही टीम आली असल्याची चर्चा होती. मात्र, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीची टीम तिथे गेली असल्याची माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली आहे. आज सकाळीच शाहरुख खानने आर्थर रोड कारागृहात जाऊन आर्यन खानची भेट घेतली होती. त्यानंतर लगेच एनसीबीची टीम ‘मन्नत’वर दाखल झाली होती.

यानंतर आम्ही शाहरुख खानचा व्हायरल फोटो कधीचा आहे हे शोधण्यासाठी रिव्हर्स इमेजचा आधार घेतला. या शोधा दरम्यान आम्हाला filmfare.com वर 16 मार्च2017 रोजीची बातमी आढळून आली. यात व्हायरल फोटोशी मिळते जुळते फोटो आढळून आले. बातमीत म्हटले आहे की. शाहरुख खान काल रात्री आलियाच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला आणि त्याच्या कारने एका फोटोग्राफरच्या पायाला दुखापत झाल्यामुळे चुकीच्या बातम्या पसरल्या. फोटोग्राफरवर शाहरुखचे खाजगी डॉक्टर उपचार करत असताना सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

याशिवाय आम्हाला अमर उजाला या हिंदी वर्तमापत्राच्या वेबसाईटवर देखील व्हायरल फोटो आढळून आला.

Conclusion

आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की एनसीबीने शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर छापा मारलेला नाही तसेच व्हायरल फोटो देखील आर्य़न प्रकरणादरम्यानचा नाहीय

Result: Misleading

Our Sources

filmfare.com

Amar Ujala


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,898

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage