सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.

लता मंगेशकरांचे अंत्यदर्शन घेताना शाहरुख खान थुंकला?
लता मंगेशकरांचे अंत्यदर्शन घेताना शाहरुख खान थुंकला असल्याच्या दावयाने व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भारतरत्नजगविख्यात गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. यात अभिनेता शाहरुख खान देखील होता. तो अंत्यदर्शनादरम्यान लतादीदींचया शवाकडे थुंकला असा दावा केला जात आहे. पण हे खरे नाही, फॅक्ट चेक इथे वाचा.

बिहारच्या ऋतुराज चौधरीने 51 सेकंद गुगल हॅक केले?
सोशल मीडियावर बिहारच्या ऋतुराज नावाच्या मुलाचे खूप कौतुक होत आहे. बिहारच्या ऋतुराज चौधरीने 51 सेकंद गुगल हॅक केले, त्याचे हे काम गुगलला इतके आवडले की ऋतुराजला नोकरीची ऑफर दिली गेली आहे असा दावा व्हायरल झाला आहे. पण बिहारच्या मुलाने गुगल हॅक केल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे. बिहारच्या ऋतुराजने कंपनीला फक्त एक बगबद्दल सांगितले होते. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कुंभमेळ्यात 400 साधुंनी अग्निदेवतेला शरीर अर्पण केल्याचा व्हिडिओ व्हायरल?
कुंभमेळा कव्हर करताना, बीबीसी टीमने कुंभस्नानापूर्वी सुमारे 400 साधू अग्निदेवतेला त्यांचे शरीर अर्पण करताना पाहिले. त्यांनी या प्रसंगाचा व्हिडिओ काढला. जळणाऱ्या लाकडापासून निर्माण होणाऱ्या तीव्र उष्णतेमुळे बीबीसी कॅमेरा टीमला आगीपासून दूर जावे लागले. आगीच्या लाकडावर पडलेल्या साधूंना काहीच झाले नाही. पण हे खरे नाही हा व्हिडिओ तामिळनाडूमधील साधूचा आहे. फॅक्ट चेक इथे वाचा.

कर्नाटकात तिरंगा काढून भगवा फडकवण्यात आला? चुकीचा दावा व्हायरल
कर्नाटकात तिरंगा काढून भगवा फडकवण्यात आला असल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे. कर्नाटक हे ‘हिजाब विरुद्ध भगवी-शाल’ आंदोलनाचे रणांगण बनले आहे.शिवमोग्गा येथील सरकारी महाविद्यालयात राष्ट्रध्वज तिरंगा काढून भगवा फडकवण्यात आला असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. पण हा दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

अफगाणिस्तानमध्ये मोबाईलवर बंदी घातल्याच्या नावाखाली पाकिस्तानचा व्हिडिओ व्हायरल
अफगाणिस्तानमध्ये मोबाईलवर बंदी घातल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सैनिक मोबाईलचा ढिग पायाखाली तुडवत असल्याचे दिसत आहे. तालिबाननी मोबाईल वापरणा-यांना मृत्युदंडाची शिक्षा देणार असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. पण व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानमधील नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.