सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.

चार इंजिनची ट्रेन कोळसा पुरवण्यासाठी रात्रंदिवस चालवली जात आहेे का?
राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, 4 लोकोमोटिव्ह असलेली ट्रेन कोळसा पुरवण्यासाठी रात्रंदिवस चालवली जात आहे. काही दिवसांपुर्वी, देशातील अनेक भागांमध्ये कोळसा संपल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या. पण हा दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

शाहरुख खानचा व्हायरल फोटो मन्नत वर एनसीबीचा छापा पडल्यानंतरचा आहे का?
सोशल मीडियावर शाहरुख खानचा विना मेकअपचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो त्याच्या मन्नत बंगल्यावर एनसीबीने छापा टाकल्यानंतरचा आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केल्यानंतर शाहरुख खनाच्या बंगल्यावर छापा मारला असल्याचा दावा केला जात आहे. पण हा खरा नसल्याचा व तो फोटो जुना असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

अमरावतीतील परतवाडात दोन दहशतवादी पकडले? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य
अमरावतीतील परतवाडात दोन दहशतवादी पकडले असल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पोलिसांनी एसटी बसमध्ये बाॅम्ब ठेवणा-या दोन लोकांना मोठ्या शिताफीने पकडल्याचे दिसत आहे. दावा करण्यात आला आहे की, अमरावती- परतवाडा या बसने हे दोन दहशतवादी बाॅम्ब घेऊन निघाले होते. पण हा दावा खोटा असल्याचे आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

आर्यन खान प्रकरणानंतर समीर वानखेडे व एनसीबी टीमवर हल्ला?
सोशल मीडियात समीर वानखेडे आणि NCB टीमवर मुंबईतील गोरगाव येथे ड्रग्ज पॅडलर्सनी हल्ला केल्याच्या दाव्याने पोस्ट व्हायरल होत आहे. तसेच या हल्ल्याची बातमी एकाही माध्यमांत देखील प्रसिद्ध झाली नाही असाही दावा या हिंदीत लिहिलेल्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पण हा दावा चुकीचा असल्याचे व जुनी घटना आत्ताची म्हणून शेअर होत असल्याचे आढळून आले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

व्हायरल व्हिडिओ पाकिस्तान ने मॅच जिंकल्यावर युपीत फटाके फोडणा-यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आहे?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो उत्तर प्रदेशचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओ एका रस्त्याचा आहे जिथे पोलीस कर्मचारी अनेक काही लोकांवर लाठीमार करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये लोक थांबलेले दिसत आहेत आणि पोलिस त्यांच्यावर लाठीचार्ज करत आहेत. पण हा दावा चुकीचा आहे. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.