Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. एका बातमीचे कात्रण शेअर करण्यात आले असून यात म्हटले आहे की, भारताचे सुपुत्र, महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महारांजाच्या ऋणातून फू ना फुलाची पाकळी म्हणून उतराई होण्यासाठी व्हिएटतनाम सरकारने हो-ची-मिन्ह नगरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे.
फेसबुकवर हा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याचा दावा कितपत खरा आहे? याची पडताळणी आम्ही सुरु केली. व्हायरल बातमीच्या कात्रणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा फोटो रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधला असता sculptorvmb.com या वेबसाईटवर आम्हाला हा फोटो आढळून आला.
या फोटोविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी वेबसाईटवरील दिलेल्या मोबाईल नंबरवर शिल्पकार विजय.एम. बु-हाडे यांच्या संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “फोटोतील पुतळा मुंबई आग्रा हायवेवर नासिक ताज हॉटेल जवळ, पाथर्डी फाटा चौक येथे नाशिक महानगरपालिकेने उभारला आहे 12 फूट अश्वारूढ श्री छत्रपती शिवाजी महाराज व 10 शूर मावळे असा विजयी उत्सव दाखवण्यात आला आहे. सदर पुतळा मी स्वतः तयार केला असून (शिल्पकार विजय एम .बुऱ्हाडे 9850120960) अंदाजे 1999 साली हे शिवप्रभूंचे स्मारक नाशिक महानगराच्या प्रवेशद्वारात दिमाखाने उभे केले आहे व तमाम शिवभक्तांना प्रेरणादायी असे आहे. स्मारकाची चबुतर्यासह उंची 30 फूट आहे.”
यानंतर आम्ही व्हिएतनामची राजधानी हो-ची-मिन्ह मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे का याचा शोध पुढे सुरुच ठेवला असता आम्हाला 19 फेब्रुवारी 2015 रोजीचे एक ट्विट आढळूनआले. यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासारखाच दिसणा-या पुतळाचा फोटो शेअर करण्यात आला असून म्हटले आहे की, शिवाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून, व्हिएतनामची राजधानी हो ची मिन्ह सिटीमध्ये त्यांचा पुतळा स्थापित केला.
संग्रहित ट्विट इथे पाहू शकता.
याशिवाय आम्हाला 9 जून 2020 रोजीचे आणखी एक ट्विट आढळून आले ज्यात म्हटले आहे की, व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नसून तेथील 14 व्या शतकातील जनरल Tran Nguyen Han यांचा आहे.
यानंतर आम्ही Tran Nguyen Han या किवर्ड्सनी शोध घेतला असता आम्हाला या संदर्भात अनेक रिझल्ट गूगलवर आढळून आले.
alamy.com वर हा फोटो जनरल Tran Nguyen Han यांचा बेन थान मार्केटसमोरील पुतळा असून, किंग ले लोई यांच्या नेतृत्वाखाली सेवा करणारा १५ व्या शतकातील योद्धा असल्याचे म्हटले आहे.
zingnews.vn वेबसाईटवरील माहितीनुसार Tran Nguyen Han यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे म्हटले आहे.
हो ची मिन्ह सिटीमध्ये Bến Thành मार्केटसमोर अनेक दशकांपासून उभा असलेला जनरल Tran Nguyen Han चा हा पुतळा नवीन मेट्रो स्टेशनसाठी या ठिकाणाहून कायमचा हटवण्याच्या प्रक्रियेत असल्याचे वृत्त देखील आम्हाला आढळून आले.
अशाप्रकारे आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल होत असलेल्या फोटोतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हिएतनाममधील नाही तर नाशिकमधील आहे. तसेच व्हिएतनाममध्येदेखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही. तेथील 14 व्या शतकातील योद्धा जनरल Tran Nguyen Han चा पुतळा शिवाजी महाराजांचा म्हणून याआधी व्हायरल झाला आहे.
sculptorvmb.com
zingnews.vn
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
March 8, 2025
Prasad S Prabhu
March 6, 2025
Prasad S Prabhu
January 11, 2025