Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सिंगापूरने WHO च्या नियमांविरुद्ध कोरोना रुग्णाचे पोस्टमार्टम करुन जगापुढे सत्य आणल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, “कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करणारा सिंगापूर जगातील पहिला देश बनला आहे. सखोल तपासानंतर असे आढळून आले की कोविड -19 हा विषाणू म्हणून अस्तित्वात नाही, तर किरणोत्सर्गाच्या संपर्कात आलेला जीवाणू आहे आणि रक्तामध्ये गोठून मानवी मृत्यूला कारणीभूत आहे”.
सिंगापूरने WHO च्या नियमांविरुद्ध कोरोना रुग्णाचे पोस्टमार्टम करुन जगापुढे सत्य आणले आहे का? व हा देश कोवि-19 ने मृत्यू पावलेल्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करणारा पहिला देश ठरला आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय व्हायरल पोस्टमध्ये अनेक दावे करण्यात आले आहेत. त्याचीही सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला.
दावा क्रं 1- सिंगापूर हा कोविड-19 रुग्णाचे पोस्टमार्टम करणारा जगातील पहिला देश आहे.
सत्य- या आधीही इटली, रशिया अमेरिका या देशांनी कोविड रुग्णांचे पोस्टमार्टम केल्याचे दावे व्हायरल झाले आहेत मात्र यात तथ्य नाही.
दावा क्रं2 – सिंगापूरने जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमाविरुद्ध जात कोविज रुग्णाचे पोस्टमार्टम केले.
सत्य- जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना मृतांचे पोस्टमार्टम सुरक्षितपणे कसे करावे याचे मार्गदर्शन आपल्या वेबसाईटवर जाहीर केले आहे.
दावा क्रं-3- कोविड व्हायरसमुळे नाही तर बॅक्टेरियामुळे होतो
सत्य- WHO च्या मते, कोविड-19 हा SARS-CoV-2 नावाच्या नवीन कोरोना व्हायरसमुळे होणारा आजार आहे. याआधीही, WHO ने कोविड-19 विषाणू नसून बॅक्टेरियामुळे होतो हा समज खोटा ठरवला होता.
दावा क्र-4- सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने कोविड -19 उपचार ‘प्रोटोकॉल’ मध्ये त्वरित बदल केला आणि त्याच्या सकारात्मक रुग्णांना एस्पिरिन दिले. त्यांनी 100 मिली ग्रॅम आणि ‘Imromac’ घेण्यास सुरुवात केली. परिणामी, रुग्ण बरे होऊ लागले आणि त्यांची तब्येत सुधारू लागली.
सत्य- कोरोना पेशंटला उपचारासाठी भरती केल्यानंतर त्यांना अॅंटीबायोटीक गोळ्या दिल्या जाता, यामागे इतर बॅक्टेरियांचा पेशंटच्या शरीरात शिरकाव होऊ नये हा उद्देश्य असतो. या गोळ्यांमुळे कोरोना व्हायरसवर काही फरक पडत नाही.
दावा क्र 5- कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर आणि आयसीयूची गरज नाही.
सत्य- सर्व वरिष्ठ वैद्यकीय व्यवसायिकांच्या मते, गंभीर श्वसन आजार किंवा बहु-अवयव किंवा मूत्रपिंड निकामी असलेल्या कोविड रूग्णांवर आयसीयूमध्ये उपचार केले जातात आणि व्हेंटिलेटर वापरतात. परंतु सर्व कोरोना व्हायरस रुग्णांना त्याची आवश्यकता नसते.
याबाबत आम्ही अधिक शोध घेतला असता आम्हाला सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाची फेसबुक पोस्ट आढळून आली ज्यात हे सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, सिंगापूरने WHO च्या नियमांविरुद्ध कोरोना रुग्णाचे पोस्टमार्टम करुन जगापुढे सत्य आणलेले नाही तसेच कोरोना हा बॅक्टेरिया असल्याचे देखील म्हटलेले नाही. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटना– https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019/advice-for-public/myth-busters#virus
आरोग्य मंत्रालय सिंगापूर – https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=10159182946525631&id=154909330630
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा
Prasad S Prabhu
May 28, 2025
Vasudha Beri
August 28, 2024
Prasad S Prabhu
December 23, 2023