Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानात सैर भैर पळतानाचा व्हिडीओ.
हा व्हिडिओ नोव्हेंबर २०२३ मध्ये गाझा पट्टीतील एका इंडोनेशियन रुग्णालयावर झालेल्या बॉम्ब हल्ल्याचा आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनी, भारत सरकारने पाकिस्तानच्या ताब्यात असलेले काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारतीय लष्कराने या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले आहे. या कारवाईनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानात सैर भैर पळतानाचा व्हिडीओ असा दावा करत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ ३६ सेकंदांचा आहे, ज्यामध्ये एका ठिकाणी बॉम्बस्फोट होताना दिसत आहे. या काळात लोक तिथून पळून जातानाही दिसतात.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
दाव्याच्या कॅप्शनमध्ये “एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तान मध्ये सैर भैर पाळताना आणखीन एक व्हिडिओ आला समोर” असे म्हटले आहे.
आम्ही व्हायरल व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला. आम्हाला व्हिडिओच्या तळाशी उजवीकडे कतारी मीडिया आउटलेट अल-जझीराचा लोगो दिसला. यावरून शोध घेताना आम्हाला ९ नोव्हेंबर २०२३ रोजी अल-जझीराच्या फेसबुक अकाउंटवर अपलोड केलेला एक व्हिडिओ रिपोर्ट सापडला.

या जवळजवळ ३ मिनिटांच्या व्हिडिओ रिपोर्टमध्ये, व्हायरल व्हिडिओमधील दृश्ये १ मिनिट ३० सेकंदावर पाहता येतात. व्हिडिओसोबत असलेल्या अरबी कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे: “हे उत्तर गाझा येथील इंडोनेशियन रुग्णालयावर झालेल्या बॉम्ब हल्ल्याचे दृश्य आहे, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत”.
याशिवाय, ९ नोव्हेंबर २०२३ रोजी अल-जझीराच्या त्याच फेसबुक अकाउंटवरून अपलोड केलेला आणखी एक व्हिडिओ आढळला. ज्यामध्ये हल्ल्यादरम्यान या इंडोनेशियन रुग्णालयाच्या आत आणि बाहेरील दृश्ये होती. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये गाझा पट्टीच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याचे विधान देखील होते. ज्यामध्ये त्यांनी इस्रायलवर हल्ला चढवला आणि म्हटले की “आता ते धोकादायक टप्प्यात पोहोचले आहे. इंडोनेशियन रुग्णालयाच्या आजूबाजूच्या भागात हल्ले करण्यात आले आहेत, हे रुग्णालय उत्तर गाझा पट्टीतील आरोग्य सेवांचा कणा आहे. या हल्ल्यात झालेल्या मृतांची आणि जखमींची संख्या आम्ही मोजू शकत नाही”.

तपासादरम्यान, आम्हाला ९ नोव्हेंबर २०२३ रोजी पॅलेस्टिनी छायाचित्रकार महमूद अबुसलाम यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अपलोड केलेला एक व्हिडिओ देखील सापडला. हा व्हिडिओ वेगळ्या अंगलमधून घेण्यात आला आहे, ज्यामध्ये इंडोनेशियातील रुग्णालयाभोवती बॉम्बस्फोट होताना दिसत आहे.

तपासादरम्यान, आम्हाला २० नोव्हेंबर २०२३ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जारी केलेला एक रिपोर्ट सापडला, ज्यामध्ये त्यांनी उत्तर गाझा येथील इंडोनेशियन रुग्णालयावरील हल्ल्याचा निषेध केला होता. २० नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्यात, इंडोनेशियन रुग्णालयात उपचार घेत असलेले सुमारे १२ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला. याशिवाय अनेक लोक जखमीही झाले. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर या रुग्णालयावर सुमारे पाच वेळा हल्ला झाल्याचेही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

द गार्डियनच्या वृत्तानुसार, हे रुग्णालय इंडोनेशियाने २०१६ मध्ये उत्तर गाझा येथे ९ दशलक्ष डॉलर्स खर्चून बांधले होते. १४० खाटांचे हे रुग्णालय पॅलेस्टिनी आणि इंडोनेशियन कर्मचाऱ्यांद्वारे चालवले जात होते. त्याच वेळी, इंडोनेशियन रुग्णालयावरील हल्ल्यांच्या मालिकेदरम्यान, इस्रायलने हमासवर दहशतवादी कारवाया लपविण्यासाठी हे रुग्णालय बांधल्याचा आरोप केला होता.

अल-जझीरा वाहिनीने पाकिस्तानातील सियालकोटवरील भारतीय सैन्याच्या हल्ल्याचे नवीन फुटेज प्रसिद्ध केले असे सांगत यापूर्वीही हा दावा व्हायरल झाला होता. त्यावेळी न्यूजचेकर हिंदीने केलेले फॅक्ट चेक येथे वाचता येईल.
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ २०२३ मध्ये गाझा पट्टीतील इंडोनेशियन रुग्णालयावर झालेल्या बॉम्ब हल्ल्याचा आहे.
Our Sources
Videos uploaded by Al-Jazeera FB account on 9th Nov 2023
Videos uploaded by Palestinian Photographer Mahmoud Abusalama on 9th Nov 2023
Prasad S Prabhu
December 6, 2025
Vasudha Beri
December 4, 2025
Salman
November 29, 2025