Wednesday, March 29, 2023
Wednesday, March 29, 2023

घरFact Checkअभिनेता सोनू सूदने काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, चुकीचा दावा व्हायरल

अभिनेता सोनू सूदने काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, चुकीचा दावा व्हायरल

अभिनेता सोनू सूदने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला जात आहे.

एका फेसबुक यूजरने सोनू सूदचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘सोनू सूदने पंजाब काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.’

अभिनेता सोनू सूदने काँग्रेसमध्ये प्रवेश

फेसबुक पोस्ट इथे पहा

फेसबुक पोस्ट इथे वाचा

वरील दावा ट्विटरवरही शेअर करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा यांनी सोनू सूदसोबतचा फोटो ट्विट करत काँग्रेस परिवारात आपले स्वागत असल्याचे लिहिले आहे.

ट्विटची संग्रहित आवृत्ती इथे पहा.

संग्रहित ट्विट इथे वाचा.

livehindustan.com ने 8 जानेवारी 2022 रोजी प्रकाशित केलेल्या लेखानुसार, पंजाबमधील सर्व विधानसभा जागांसाठीच्या निवडणुका एकाच टप्प्यात पूर्ण केल्या जातील. पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून १० मार्चला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, अभिनेता सोनू सूदने काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचा दावा केला जात आहे.

Fact Check/Verification 

अभिनेता सोनू सूदने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्डच्या मदतीने गुगलवर सर्च करायला सुरुवात केली. यादरम्यान आम्हाला असा कोणताही रिपोर्ट सापडला नाही ज्यामध्ये ‘अभिनेता सोनू सूदने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे’ असे म्हटले आहे.

गुगल सर्च दरम्यान मिळालेल्या झी न्यूज हिंदीमधील लेखानुसार, 10 जानेवारी 2022 रोजी सोनू सूदची बहीण मालविका सूदने पंजाब काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नीही उपस्थित होते.

यानंतर आम्ही पंजाब काँग्रेसचे अधिकृत ट्विटर हँडल तपासण्यास सुरुवात केली. यादरम्यान, आम्हाला असे कोणतेही ट्विट आढळले नाही, ज्यामध्ये सोनू सूदने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली आहे.

मात्र, यावेळी आम्हाला पंजाब काँग्रेसचे एक ट्विट आढळले. मिळालेल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘काँग्रेस परिवारात स्वागत आहे, मालविका सूद सच्चर, ज्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Tweet Post

अधिक माहितीसाठी आम्ही पंजाब काँग्रेसचे प्रवक्ते गुरविंदर बाली यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की “सोनू सूदने कॉंग्रेस पक्षात केलेला नाही, परंतु त्यांची बहीण मालविका सूद कॉंग्रेस पक्षात सामील झाली आहे.”

यानंतर आम्ही सोनू सूदचे अधिकृत ट्विटर हँडल तपासण्यास सुरुवात केली. यादरम्यान आम्हाला सोनू सूदचे एक ट्विट मिळाले. प्राप्त झालेल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “माझी बहीण मालविका सूद तिच्या राजकीय प्रवासावर आहे, मी तिला शुभेच्छा देतो आणि तिच्या आयुष्याच्या या नवीन अध्यायात तिची भरभराट होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. मालविकाला शुभेच्छा! एक अभिनेता आणि मानवतावादी म्हणून माझे स्वतःचे कार्य कोणत्याही राजकीय संलग्नता किंवा विचलनाशिवाय सुरू आहे.”

Read More: सचिन तेंडूलकरने पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला खांदा दिलेला नाही, चुकीचा दावा व्हायरल

Our Sources

zee News

Punjab Congress Tweet

Sonu Sood Tweet

Direct Contact

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular