Thursday, March 28, 2024
Thursday, March 28, 2024

HomeFact Checkचार इंजिनची ट्रेन कोळसा पुरवण्यासाठी रात्रंदिवस चालवली जात आहेे का?

चार इंजिनची ट्रेन कोळसा पुरवण्यासाठी रात्रंदिवस चालवली जात आहेे का?

Authors

राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, 4 लोकोमोटिव्ह असलेली ट्रेन कोळसा पुरवण्यासाठी रात्रंदिवस चालवली जात आहे.

काही दिवसांपुर्वी, देशातील अनेक भागांमध्ये कोळसा संपल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या. एकीकडे केंद्रीय वीज आणि कोळसा मंत्रालयाचे अधिकारी कोळशाच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नसल्याचा दावा करत असताना दुसरीकडे दिल्लीसह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यांमध्ये वीज संकटाचा दावा केला होता.

याच दरम्यान राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, 4 इंजिन असलेली ट्रेन कोळसा पुरवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे.

Fact Check/Verification

‘4 लोकोमोटिव्ह असलेली ट्रेन कोळसा पुरवठा करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे’ या दाव्यासह शेअर केलेला हा व्हिडिओ पडताळणीसाठी आम्ही व्हिडिओला कीफ्रेममध्ये विभागून Google वर एक कीफ्रेम शोधली. यात आम्हाला अशी अनेक वेब पेज आढळून आली ज्ज्यायात त दावा केला आहे की व्हायरल व्हिडिओ जुना आहे.

team-bhp.com नावाच्या वेबसाईटवरील पोस्टमधील माहिती प्रमाणे व्हायरल व्हिडिओ जानेवारी 2021 पासून इंटरनेटवर आहे. कोळशाचे संकट हे सप्टेंबर 2021 मध्ये सुरु झाले आहे.

या पोस्टसोबत एक YouTube व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की वरील YouTube व्हिडिओ 6 जानेवारी 2021 रोजी प्रकाशित झाला आहे आणि वरील व्हिडिओनुसार, हा व्हिडिओ ‘SUPER SHESHNAG’ नावाच्या ट्रेनचा आहे. वरील व्हिडिओचे शिर्षक ‘India’s Longest ever Freight ‘SUPER SHESHNAG’ in Bilaspur Division.’ असे आहे.

‘SUPER SHESHNAG’ या कीवर्डचा वापर करून ट्विटर शोध घेतला असता 6 जानेवारी 2021 रोजीचे ‘रेल्वे मंत्रालयाने’ शेअर केलेले ट्विटआढळले, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओ आहे.

रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेल्या या ट्विटच्या कॅप्शननुसार, “Another feather in its cap: After successful running of ‘SHESHNAG’ now, Bilaspur Division of SECR operated ‘SUPER SHESHNAG’- First ever long haul of 4 loaded trains from Korba with total load of 20906 tonnes.”

याच दरम्यान आम्हाला 6 जानेवारी 2021 रोजीचे ‘‘Prasar Bharati News Services पी.बी.एन.एस ‘ ने शेअर केलेले एक ट्विट मिळाले, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओ देखील आहे.

यानंतर आम्हाला ‘डीआरएम हुबली’ आणि ‘डीआरएम बिलासपूर’ यांनी शेअर केलेले ट्विटही मिळाले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की हे दोन्ही ट्विट 6 जानेवारी 2021 रोजी शेअर केले गेले होते.

या दाव्यासंबंधी आमचा इंग्रजी तथ्य पडताळणी रिपोर्ट येथे वाचू शकता.

Conclusion

आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की ‘4 इंजिन असलेली एक ट्रेन कोळसा पुरवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे’ या दाव्यासह शेअर केलेला व्हिडिओ जुना आहे. व्हायरल व्हिडिओ जानेवारी 2021 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे, तर सप्टेंबर महिन्यापासून कोळशाची टंचाई सुरू झाली आहे, ज्यामुळे कोळशाच्या कमतरतेशी संबंधित व्हायरल व्हिडिओ शेअर केल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.

Result: Misleading

Our Sources

YouTube video

Ministry Of Railways


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular