सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक सार्वजनिक रस्त्यावर फटाक्यांच्या लांबलचक माळा अतंरण्यात आलेल्या दिसत आहेत. तिथे शेकडो लोक जमले आहेत हे फटाके फुटल्यानतर अनेक लोक ते दृश्य मोबाईलमध्ये, कॅमे-यात कैद करताना दिसत आहेत. दावा करण्यात येत आहे की,भारतीय हिंदूंनी अमेरिकेत दिवाळीनिमित्त फटाके फोडले याचा हा व्हिडिओ आहे.

युट्यूबवर देखील याच दाव्याने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Fact Check/Verification
व्हायरल होत असलेला व्हिडिओ अमेरिकेत दिवाळी दरम्यान फोडण्यात आलेल्या फटाक्यांचा आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला यासाठी व्हिडिओमधील काही किफ्रेम्स काढून गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्यानाने शोध घेतला असता आम्हाला एक चीनी भाषेतील फेसबुक पोस्ट आढळून आली. त्यात हा व्हिडिओ आढळून आला. या पोस्टचा गुगल ट्रांसलेटच्या साहाय्याने अनुवाद केला. यात म्हटले आहे की, “Baishatun Mazuचा दौरा म्हणजे काय पैसे जळत आहे? हा पैसा जाळण्याचा रेकॉर्ड आहे!”
आम्ही Baishatun Mazu या किवर्ड्सने पुढे शोध सुुरु ठेवला. पण आम्हाला focustaiwan.tw या तैवानी वेबसाईटवर 4 एप्रिल 2011 रोजीचा एक लेख आढळून आला. ज्यात म्हटले आहे की, तैवानमधील अशा सर्व धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी सर्वात दूरचा प्रवास करणार्या मियाओली काउंटीमधील बैशाटुन गोंगटियन मंदिराने आयोजित केलेल्या माझू या सागरी देवीची मिरवणूक रविवारी उशिरा सुरू होणार आहे.
बैशाटुन गोंगटियन मंदिराने आयोजित केलेल्या या वर्षीच्या कार्यक्रमादरम्यान, ताओवादी समुद्र देवी माझूची मिरवणूक युनलिन काउंटीपर्यंत सुमारे 400 किलोमीटरचा प्रवास करणार होती.
हे देखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिसिव्ह करण्यासाठी रोमने टॅक्सी पाठविली?
अधिक शोध घेतला असता, 16 एप्रिल 2021 रोजीटा तैवानमधील न्यूज चॅनेल SETN चा YouTube व्हिडिओ आढळून आला ज्यात व्हायरल व्हिडिओ क्लिप आढळली. व्हिडिओच्या शीर्षकाचा अनुवाद केला यात म्हटले आहे की, ‘Baishatun Mazu चे स्वागत करण्यासाठी फटाके 500 मीटरपर्यंत पसरतात.
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ अमेरिकेत भारतीय हिंदूंनी दिवाळीत फटाके फोडल्याचा नाही तर तैवानमधील धार्मिक उत्सवादरम्यानचा आहे.
Result : Misleading
Source
SETN
focustaiwan.tw
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.