Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeFact Checkतैवानमध्ये दिवाळीनिमित्त 101 मजली इमारतीवर आतिशबाजी करण्यात आली?

तैवानमध्ये दिवाळीनिमित्त 101 मजली इमारतीवर आतिशबाजी करण्यात आली?

Authors

तैवानमध्ये दिवाळीनिमित्त 101 मजली इमारतीवर आतिशबाजी करण्यात आल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, अतिशय सुंदर आतिशबाजी चे नियोजन आहे तैवान देशाचे ते पण दिवाळीत. कमाल आहे.

संग्रहित

हा दावा मराठीशिवाय इंग्रजीतही व्हायरल झाला आहे.

फेसबुकवर देखील हा व्हिडिओ तैवानमध्ये दिवाळीनिमित्त केलेल्या आतिशबाजी असल्याचा दावा करणा-या पोस्ट आढळून आल्या.

Fact Check/Verification

व्हायरल व्हिडिओ तैवानमधील दिवाळीनिमित्त आतिशबाजी केल्याचा आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी गूगल रिव्हर्स इमेजचा आधार घेतला. व्हिडिओतील काही किफ्रेम्स काढल्या आणि रिव्हर्स इमेच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला Snow C या युट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओशी मिळता-जुळता व्हिडिओ आढळून आला. हा व्हिडिओ 1 जानेवारी 2021 रोजी अपलड करण्याच आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 2021 नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तैपेई शहर, तैवानमधील काउंटडाउन फटाके.


व्हिडिओत तैवानमधील प्रतिष्ठित तैपेई शहरातील 101 मजली इमारतीवरील 2021 नवीन वर्षाचे स्वागत फटाके शो म्हणून त्याचा उल्लेख केला असल्याने आम्ही अधिक शोध घेतला असता आम्हाला याच दाव्याचे व्हिडिओत आढळून आले.

याशिवाय Taiwan News च्या युट्यूब चॅनलवर देखील हा व्हिडिओ आढळून आला. यात देखील हा व्हिडिओ 2021 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तैपई शहरातील इमारतीवर आतिशबाजी करण्यात आल्याचे म्हटले आहे.

Taiwan News’ ने तैपेई इमारतीवर 2021 या नवीन वर्षाच्या फटाक्यांच्या शोबद्दल एक लेख प्रकाशित केला होता. लेखानुसार, तैपेई 101 च्या वार्षिक फटाक्यांच्या शोने 2021 च्या आगमनाचे 16,000 फटाक्यांसह स्वागत केले. कार्यक्रमासाठी जमलेले हजारों दर्शक साक्षीदार होते.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, तैवानमधील तैपई इमारतीवर दिवाळीनिमित्त आतिशबाजी करण्यात आली नव्हती तर 2021 या नववर्षाच्या स्वागतासाठी आतिशबाजी केली होती तोच व्हिडिओ चुकीच्या दाव्याने या दिवाळीत व्हायरल झाला आहे.

Result : Misleading

Source

Taiwan News

Snow C


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular