पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाच्या दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की मुंबईतील पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे आणि दुसरा दहशतवादी मारला गेला आहे. मात्र आमच्या तपासात संबंधित व्हिडीओ मुंबईतील मॉक ड्रिलचा असल्याचे स्पष्ट झाले.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
Fact Check/Verification
पोस्टमध्ये केलेल्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही प्रथम कीवर्ड शोध केला. मुंबईत कुठेही कोणताही दहशतवादी पकडल्याची किंवा मारला गेल्याची अलीकडील बातमी आम्हाला आढळली नाही.

पुढील तपासात आम्ही व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला, आम्हाला १४ मे २०२५ रोजी ThePerfectVoiceNews नावाच्या युट्यूब चॅनलवर त्याच व्हिडिओबद्दल एक रिपोर्ट सापडला, ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की हा व्हिडिओ मुंबईत आयोजित केलेल्या मॉक ड्रिलची क्लिप आहे. वर्णनात असे लिहिले होते की, “चांदिवली येथील नाहर अमृत शक्ती रोड येथे आज एक नियमित मॉक ड्रिल घेण्यात आली. अधिकाऱ्यांनी हा एक नियोजित सराव असल्याची पुष्टी केली आहे आणि नागरिकांना घाबरू नका किंवा काळजी करू नका असे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता सुनिश्चित करण्यासाठी हे सराव आयोजित केले जातात.”
यावरून सुगावा घेऊन आम्ही काही कीवर्ड शोधले, आम्हाला १३ मे रोजी साकीनाका पोलिसांच्या अधिकृत X हँडलवरून केलेली एक पोस्ट सापडली, ज्यामध्ये म्हटले होते की, “१३ मे २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता, साकीनाका पोलिस स्टेशनच्या अखत्यारीत येणाऱ्या नाहर अमृत शक्ती, डी मार्ट, चांदिवली, साकीनाका, मुंबई ४०००७२ येथे एक मॉक ड्रिल घेण्यात आली. या मॉक ड्रिलमध्ये साकीनाका विभाग, मुंबईचे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप मैरल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पीएसआय कुंडलकर, पश्चिम क्यूआरटी बटालियनचे सात कमांडो आणि मुख्य क्यूआरटी बटालियनचे पाच कमांडो तसेच पीएसआय मसाळ उपस्थित होते.”

अधिक माहितीसाठी आम्ही साकीनाका पोलीस स्थानकाशी संपर्क साधला, “व्हायरल होत असलेले व्हिडीओ १३ मे रोजी झालेल्या मॉक ड्रिलशी संबंधित आहेत. दरम्यान कोणीही व्हायरल होत असलेल्या दाव्यांवर विश्वास ठेऊ नका.” अशी माहिती देण्यात आली.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात मुंबईत पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे आणि दुसरा दहशतवादी मारला गेला, हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्षात हा व्हिडीओ मुंबईत झालेल्या मॉक ड्रिलचा आहे.
Our Sources
Gooogle Search
Video uploaded by ThePerfectVoiceNews on May 14, 2025
Tweet made by Sakinaka Police on May 13, 2025
Convrsation with Sakinaka Police Station